गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 866 नव्या रुग्णांची नोंद करण्या आली तर 41 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. सोमवारी (25 जुलै) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत एकूण 18 हजार 148 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, एकूण रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 98.46 टक्के आहे. देशात आतापर्यंत कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा 4,32,28,670 वर पोहोचला आहे.
24 तासांच्या कालावधीत सक्रिय कोरोना रुग्णांमध्ये 1,323 प्रकरणांची वाढ नोंदवण्यात आली आहे. एकूण संसर्गांपैकी ०.३४ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
गेल्या २४ तासात 41 जणांचा मृत्यू झाल्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या आता 5,26,074 झाली आहे. भारतात, मार्च २०२० मध्ये कोविड महामारीमुळे पहिला मृत्यू नोंदवला गेला.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या मते, 24 जुलैपर्यंत कोविड-19 साठी 87,27,59,815 नमुने तपासण्यात आले आहेत. यापैकी 2,39,751 नमुन्यांची रविवारी चाचणी करण्यात आली.