Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरोनामुळे भारतात 2.66 कोटी बालविवाहाच्या घटना; जाणून घ्या ‘या’ देशातील बालविवाहाची आकडेवारी

कोरोना काळात जगामध्ये अनेक उलथापालथी झाल्याचं दिसून आलं, त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक समस्या निर्माण झाल्याचं दिसून आलं. या काळात दक्षिण आशियातील घसरलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलींची लग्न कमी वयात झाल्याचं युनिसेफने त्याच्या एका अहवालात म्हटलं आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 24, 2023 | 01:33 PM
कोरोनामुळे भारतात 2.66 कोटी बालविवाहाच्या घटना; जाणून घ्या ‘या’ देशातील बालविवाहाची आकडेवारी
Follow Us
Follow Us:

कोरोना (Corona) काळात जगामध्ये (World) अनेक उलथापालथी झाल्याचं दिसून आलं, त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक समस्या निर्माण झाल्याचं दिसून आलं. या काळात दक्षिण आशियातील घसरलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलींची (Girls) लग्न कमी वयात झाल्याचं युनिसेफने त्याच्या एका अहवालात म्हटलं आहे.

दरम्यान या काळात शाळा बंद असल्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचं या अहवालात म्हटलं आहे. भारतात या काळात 2.66 कोटी मुलींची बालविवाह करण्यात आल्याची धक्कादायक माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

युनिसेफच्या माहितीनुसार, दक्षिण आशियातील बालविवाह केलेल्या मुलींची संख्या 29 कोटी असून ही संख्या जगातील बालविवाहाच्या संख्येच्या 45 टक्के इतकी आहे. त्यामुळे जगातील बालविवाह रोखण्यासाठी जे काही प्रयत्न करण्यात आले होते ते अयशस्वी झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.

सर्वात जास्त बालविवाह कोणत्या देशांत होतात ?

भारत

बालविवाहाची संख्या: 2,66,10,000
18 व्या वर्षी लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण: 47 टक्के

लग्न करण्याचे कायदेशीर वय: मुलगा – 21 / मुलगी – 18

इथियोपिया

बालविवाहाची संख्या: 19,74,000
18 व्या वर्षी लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण: 41 टक्के

इथियोपियात अशी देखील प्रथा आहे की, चुलत भाऊ आपल्या बहिणीचे अपहरण करून जबरदस्तीने तिच्याशी लग्न करू शकतो. त्यामुळे पाच पैकी एका तरी मुलीचे 18 वयाच्या आतच लग्न केले जाते.

लग्न करण्याचे कायदेशीर वय: मुलगा – 18 / मुलगी 18

ब्राझील

बालविवाहाची संख्या: 29,28,000
18 व्या वर्षी लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण: 36 टक्के

लग्न करण्याचे कायदेशीर वय: मुलगा – 18 / मुलगी – 18 – पालकांच्या संमतीने – 16

नायजेरिया

बालविवाहाची संख्या: 33,06,000
18 व्या वर्षी लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण: 43 टक्के

लग्न करण्याचे कायदेशीर वय: मुलगा – 18/ मुलगी – 18

बांग्लादेश

बालविवाहाची संख्या : 39,31,000
18 व्या वर्षी लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण: 52 टक्के

लग्न करण्याचे कायदेशीर वय: मुलगा – 21 / मुलगी – 18

Web Title: 2 66 crore cases of child marriage in india due to corona know the statistics of child marriage in this country nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2023 | 01:33 PM

Topics:  

  • covid
  • india
  • NAVARASHTRA
  • world

संबंधित बातम्या

Chandrapur News: धोकादायक इमारतीत शिक्षणाचा खेळ; भेगा पडलेल्या भिंती, उखडलेली फरशी… विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
1

Chandrapur News: धोकादायक इमारतीत शिक्षणाचा खेळ; भेगा पडलेल्या भिंती, उखडलेली फरशी… विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Diveagar Beach Picnic Accident: दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना!
2

Diveagar Beach Picnic Accident: दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना!

MUMBAI : शिवाजी पार्कात आंदोलन नको, आझाद मैदानात जा; CJPच्या आंदोलनाला स्थानिकांचा विरोध
3

MUMBAI : शिवाजी पार्कात आंदोलन नको, आझाद मैदानात जा; CJPच्या आंदोलनाला स्थानिकांचा विरोध

नववीच्या विद्यार्थ्यांना आता आयकराचे धडे; NCERT अभ्यासक्रमात वैयक्तिक टॅक्सचा समावेश
4

नववीच्या विद्यार्थ्यांना आता आयकराचे धडे; NCERT अभ्यासक्रमात वैयक्तिक टॅक्सचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.