भीषण अपघातात 'मॅजिक व्हॅन'चा झाला चुराडा; लहान मुलांसह ७ जणांचा जागीच मृत्यू, ८ जणांची प्रकृती चिंताजनक
उत्तरप्रदेशातील हाथरसमध्ये भीषण अपघात झाला आहे. मॅजिक गाडी आणि ट्रकच्या जोरदार धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला असून जिल्हा प्रशासनाला सर्व ती मदत करण्याचे आदेश दिले आहेत.
अपघातासंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
हाथरस जंक्शन पोलिस स्टेशन हद्दीतील बरेली-मथुरा रोडवरील जैतपूर गावाजवळ ही दुर्घटना घडली. आज दुपारी प्रवाशांनी भरलेल्या मॅजिक व्हॅनला एका कंटेनरने धडक दिली. टक्कर इतकी जोराची होती की व्हॅनचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 7 जण जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, मॅजिक व्हॅनमध्ये 20 प्रवासी होते. सर्व प्रवासी चांदपा पोलीस स्टेशन हद्दीतील कुमराई गावचे रहिवासी होते. हे सर्वजण कॅन्सरने पीडित असलेल्या एका वृद्ध नातेवाईकाला पाहण्यासाठी एटा येथील नागला एमिलिया गावाला एकत्र निघाले होते. बरेली-मथुरा रोडवरील जैतपूर गावाजवळ ही दुर्घटना घडली.
कंटेनरची धडक इतकी भीषण होती की मॅजिक व्हॅन उलटून खड्ड्यात पडली. अपघातानंतर घटनास्थळी एकच आक्रोश सुरू होता. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना व्हॅनमधून बाहेर काढले. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. तिथे एका महिलेचा मृत्यू झाला.
सध्या ६ गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयातून अधिकच्या उपचारासाठी इतर ठिकाणी पाठवण्यात आले आहे. जिल्ह्यातील डीएम आणि इतर अधिकारी अपघाताची माहिती गोळा करत असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. दुसरीकडे, हातरसमधील या दुर्घटनेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेलती असून शोक व्यक्त केला आहे. प्रशासनाला जखमींना सर्व ती मदत करण्याच्याही सूचना केल्या आहेत.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. एकीकडे वाहतूक कोंडी आणि दुसरीकडे रस्त्यांची दुरावस्था यामुळे प्रवासी आणि गाडीचालक यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसंच ज्या रस्त्यांना अवजड वाहनांना बंदी असून देखील नियमांना न जुमानता मलवाहू ट्रकची खुलेआमपणे ये जा होत असते. यामुळे नागरिकांना स्थानिक प्रशासन आणि वाहतूक पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई गोवा महामार्गावर गेल्या आठवड्यापासून दरदिवशी अपघाताच्या दुर्घटना होत आहेत. अशातच आता रत्नागिरी जिल्ह्यात मालवाहू ट्रकला भीषण अपघात झाला आहे, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रत्नागिरीत मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला आहे, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा ट्रक संगमेश्वरला जांभा चिरा घेऊन जात होता. मात्र, उक्षी रेल्वे स्टेशन जवळील उतारावर येताच या ट्रकचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकांच नियंत्रण सुटलं आणि ट्रकचा अपघात झाला. ही घटना शनिवार 7 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये ट्रकमधील पाचजण जखमी झाले. त्यातील एकाला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारांदरम्यान एकाचा शनिवारी मृत्यू झाला.