हरियाणा: हरियाणातील पलवल जिल्ह्यात आज सकाळच्या सुमारास खासगी शाळेच्या (private School bus) धावत्या बसला अचानक आग लागली. या बसमध्ये जवळपास 8-10 मुलं बसली होती. आग लागताच परिसरातील लोकांनी धाव घेऊन त्यांना सुरक्षित बाहेर काढले. (School Bus Fire) काही वेळातच संपूर्ण बस भस्मसात झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही मात्र, विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅगचा पुर्ण आगीत भस्म झाल्या.
[read_also content=”गेल्या 24 तासात 5,676 कोरोना रुग्णांची नोंदl; सक्रिय संख्या ३७ हजारांच्या पुढे, आज होणार मॉक ड्रील https://www.navarashtra.com/latest-news/5676-corona-patients-registered-in-last-24-hours-active-number-is-over-37-thousand-nrps-383130.html”]
पलवलमधील जीटी रोडजवळ आज सकाळी नेहमीप्रमाणे मुलं शाळेत जाण्यासाठी घरुन निघाली. एक एक विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना अचानक बसला आग लागली. ही आग कोणत्या कारणामुळे लागली हे अजून स्पष्ट झाले नाही. पण ती शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटना घडल्यानंतर स्थानिकांनी अग्निशमन विभागाला याची माहिती दिली मात्र, त्यांना पोहचण्यास उशीर झाल्याचा आरोप काही लोकांनी केला आहे. तसेच उशिरा पोहोचल्यानंतरही अग्निशमन विभागाचे दुर्लक्ष दिसून आले. अग्निशमन दलाच्या वाहनाचा दाब काम करत नसल्याचे चालकाने सांगितले. अशा स्थितीत वाहनातून पाणी आले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी दाब सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र दाब सुरू झाला नाही.
यानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या वाहनाला पाचारण केले, दुसरे वाहन येईपर्यंत बसमधील ज्वाळा जवळच्या चपलांच्या दुकानापर्यंत पोहोचल्या. बुटांच्या दुकानाबाहेरील साईन बोर्ड आणि ताडपत्रीला आग लागली होती. दुकानासमोरून जाणाऱ्या विद्युत तारांमध्ये विद्युत तारा पडल्याने आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना धडपड करावी लागली. वीज विभागाचे एसडीओ जसवीर सिंग यांना फोनवर वीज बंद करण्यास सांगितले. त्यांनी लगेच वीज बंद केली.