मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) धार जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. लष्करातील (Army Soldier) एका जवान सुट्टीसाठी घरी आला होता आणि नातेवाईकाच्या लग्नाला गेला होता. लग्न समारंभात (Marriage Ceremony) मजामस्ती करताना या जवानाने जळणारा फटाका स्व:तच्या तोंडात ठेवला, मात्र त्याचा स्फोट होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याात दुदैवी घटना समोर आली आहे. निर्भय सिंग ( 35 वय) असं या भारतीय लष्कराच्या जवानाचं नाव असुन तो जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होता. गार्ड ऑफ ऑनर देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
[read_also content=”सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या परतीसाठी ऑपरेशन कावेरी सुरू; INS सुमेधा 278 जणांसह जेद्दाहला पोहोचली https://www.navarashtra.com/world/operation-kaveri-to-return-stranded-indians-in-sudan-ins-sumedha-reached-jeddah-with-278-men-391647.html”]
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, निर्भय सिंग हा सुट्टीवर असल्यामुळे मध्य प्रदेशातील धार येथील आपल्या घरी आला होता. 24 एप्रिल रोजी अमढेरा पोलीस ठाण्याच्या जळोख्या गावात राहणाऱ्या नातेवाईकाच्या घरी लग्नासाठी गेला. लग्नसमारंभात विधी सुरू असताना फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दरम्यान, निर्भय तेथे पोहोचला. त्याने आकाशात स्फोट करणारा क्रॅकर (रॉकेट) घेतला आणि तो तोंडात टाकला आणि आग लावली. तोंडातून फटाका बाहेर पडल्यावर आकाशात फटाके फुटतील असे निर्भयला वाटत होते, पण तसे झाले नाही. यावेळी निर्भयच्या तोंडात ठेवलेल्या रॅाकेटचा स्फोट झाला, त्यामुळे निर्भय गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेले असता निर्भयचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबीय व नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली. त्याचवेळी माहिती मिळताच अमढेरा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेनंतर, निर्भय सिंग यांच्या गावी शोककळा पसरली असुन मंगळवारी 25 एप्रिल रोजी सकाळी त्याच्या मूळ गावी जळोख्या येथे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लष्कराच्या प्रोटोकॉल नुसार, शहीद जवानाला गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. स्टेशन प्रभारी यांनी ही माहिती दिली. अमझेरा पोलिस स्टेशनचे प्रभारी सीबी सिंह यांनी सांगितले की, पोलिस स्टेशनपासून 10 किमी अंतरावर असलेल्या जलोख्या गावात या जवानाचा मृत्यू झाला. तो त्याच्या नातेवाईकाच्या घरी लग्नाला आला होता. त्याच्यावर गार्ड ऑफ ऑनर देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले