क्रीम-सीरम लावणे कायमचे जाल विसरून! चेहऱ्यावरील 'नॅचरल ग्लो'साठी 'हे' पदार्थ आहेत सर्वोत्तम
तरुण वयात त्वचा कायमच सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन ट्रीटमेंट तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या सीरम आणि लोशनचा वापर त्वचेसाठी केला जातो. पण तरीसुद्धा चेहऱ्यावर कायमच पिंपल्स, पिगमेंटेशन आणि त्वचेसंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि ऍक्ने त्वचा पूर्णपणे खराब करून टाकतात. त्यामुळे चेहऱ्याची खूप जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. त्यामुळे रोजच्या आहारात सहज पचन होणाऱ्या आणि चेहऱ्यावर ग्लो आणणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर नॅचरल ग्लो मिळवण्यासाठी आहारात कोणते पदार्थ खावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ शरीरासाठी अतिशय गुणकारी आणि प्रभावी ठरतात.(फोटो सौजन्य – istock)
ताण कमी करून मनाला शांत ठेवायचंय? मेंटल रिसेट ‘करण्याचे ‘हे’ आहेत सोपे मार्ग
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर संत्री उपलब्ध असतात. संत्री खाल्ल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो. याशिवाय त्वचा खूप जास्त चमकदार दिसते. संत्र्यामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दिवसातून एक संत्री नियमित खाल्ल्यास अनेक साकारात्मक परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतील. याशिवाय संत्र्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, कोलेजनच्या निर्मितीमध्ये मदत करतात. सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी नियमित एक संत्र खावं.
मेंदूचे कार्य कायमच सुरळीत चालू राहण्यासाठी अक्रोड खाण्याचा सल्ला दिला जातो. नियमित दोन ते तीन अक्रोड खाल्ल्यास शरीरासोबतच त्वचेला भरमसाट फायदे होतील. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि विटामिन -ई भरपूर प्रमाणात आढळून येते. त्वचेसाठी अक्रोड अतिशय लाभदायक आहे. त्यामुळे रोजच्या नाश्त्यात नियमित २ किंवा ३ अक्रोडाचा समावेश करावा.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी चिया सीड्सचे पाणी प्यायल्यास आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्यासोबतच पचनक्रिया कायमच सुरळीत राहील. वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमित एक ग्लास पाण्यात चिया सीड्स भिजवून पाण्याचे सेवन करावे. लहान लहान बिया त्वचा कायमच हायड्रेट आणि ग्लोइंग ठेवण्यास मदत करतात. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील सुरकुत्या आणि सूज करून त्वचा सुंदर करतात.
रोजच्या जेवणात टोमॅटोचा वापर केला जातो. आंबट चवीचा टोमॅटो जेवणाची चव वाढवतो आणि चेहऱ्यावर ग्लो आण्यास मदत करतो. टोमॅटो त्वचेसाठी ‘नॅचरल सनस्क्रीन’ आहे. त्यामुळे नियमित एक किंवा अर्धा टोमॅटो खावा. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी नियमित टोमॅटो खावा. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होईल.






