Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘६५ हजारांच्या पगारात मुलाचे अमेरिकेत शिक्षण कसे?’ अभिजीत दीपके यांच्या वडिलांवर प्रश्न उपस्थित; केली ‘ही’ मोठी मागणी

Abhijeet Dipke: सुरत येथील एका माहिती अधिकार (RTI) कार्यकर्त्यांने दीपके यांच्या वडिलांच्या आर्थिक स्थितीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकारचे निवृत्त कर्मचारी असूनही त्यांनी आपल्या मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवण्यासाठी लागणारा निधी कसा उभा केला, असा प्रश्न कार्यकर्ते अमित तिवारी यांनी उपस्थित केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 02, 2026 | 04:20 PM
Abhijeet Dipke: अभिजीत दीपके यांच्या वडिलांवर उपस्थित झाले प्रश्न

Abhijeet Dipke: अभिजीत दीपके यांच्या वडिलांवर उपस्थित झाले प्रश्न

Follow Us
Follow Us:
  • ‘६५ हजारांच्या पगारात मुलाचे अमेरिकेत शिक्षण कसे?’
  • अभिजीत दीपके यांच्या वडिलांवर उपस्थित झाले प्रश्न
  • केली ‘ही’ मोठी मागणीा
Abhijeet Dipke News: ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) हे आता चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. सुरत येथील एका माहिती अधिकार (RTI) कार्यकर्त्यांने दीपके यांच्या वडिलांच्या आर्थिक स्थितीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकारचे निवृत्त कर्मचारी असूनही त्यांनी आपल्या मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवण्यासाठी लागणारा निधी कसा उभा केला, असा प्रश्न कार्यकर्ते अमित तिवारी यांनी उपस्थित केला आहे. तसेच, पोलीस खटल्यांचा सामना करणाऱ्या आंदोलकांसाठी ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी जाहीर केलेल्या १ कोटी रुपयांच्या ‘कायदेशीर बचाव निधी’ची (लीगल डिफेन्स फंड) चौकशी करण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोग आणि कर विभागाकडे केली आहे.

अमित तिवारी काय म्हणाले?

‘कॉकरोच जनता पार्टी’बाबत प्रश्न उपस्थित करताना अमित तिवारी यांनी विचारले की, एखादी संघटना राजकीय पक्षाच्या नावाने निधी कसा काय गोळा करू शकते. ते म्हणाले, “CJP ही नोंदणीकृत संघटना नाही, तरीही ती एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे काम करत आहे. पक्षाच्या नावाने कायदेशीर बचावासाठी १ कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली असल्याने, ‘कॉकरोच जनता पार्टी’ची नोंदणी झाली आहे की नाही, याची निवडणूक आयोगाने चौकशी केली पाहिजे.” तिवारी पुढे म्हणाले, “जर CJP नोंदणीकृत नसेल, तर पक्षाच्या नावाने निधी गोळा करण्याच्या किंवा स्वीकारण्याच्या कृतीची चौकशी होणे आवश्यक आहे.”

सिबल यांची घोषणा

कपिल सिबल यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’साठी जाहीर केलेल्या योगदानावर जीएसटी (GST) लागू होतो का, याची तपासणी करावी, अशी विनंती या RTI कार्यकर्त्यांने ‘सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स’कडे केली आहे. उल्लेखनीय आहे की, सोमवारी कपिल सिबल यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या निधीसाठी १ कोटी रुपयांचे योगदान जाहीर केले होते. NEET पेपरफुटीच्या वादादरम्यान अटक करण्यात आलेल्या आंदोलकांना मदत करण्यासाठी CJP ने हा निधी उभारला होता.

Abhijeet Dipke: टायफॉईडनंतर पुन्हा प्रकृती खालावली? अभिजीत दिपकेंच्या घरी डॉक्टरांचं पथक दाखल; नेमकं काय झालं?

धर्मेंद्र प्रधानांनंतर आता लागणार गडकरींचा नंबर?

दरम्यान सीजेपी पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी बुधवारी पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, आगामी राजकीय आणि सामाजिक भूमिका निश्चित करण्यासाठी ही बैठक निर्णायक मानली जात आहे. या बैठकीला देशभरातील सुमारे १५ ते २० प्रमुख सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीसाठी संबंधित सदस्यांना निमंत्रण आणि संदेश पाठवण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर पक्षाची ही पहिली मोठी संघटनात्मक बैठक असल्यामुळे तिच्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

E20 इंधनासह राष्ट्रीय मुद्द्यांवर CJPची रणनीती

दरम्यान, आजच्या बैठकीत पक्षाच्या भविष्यातील धोरणांवर, संघटन विस्तारावर आणि आगामी आंदोलनांच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेषतः E20 इंधन या मुद्द्यावर पक्ष आक्रमक भूमिका घेणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजिनाम्यानंतर आता नितीन गडकरींचा नंबर लागतो काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

आंदोलनानंतर नवा वाद; सरकारच्या आश्वासनानंतरही अटकसत्र सुरूच, विद्यार्थ्यांना विश्वासघाताची भीती

Web Title: Abhijit dipke father salary us education controversy marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • Cockroach Janata Party
  • political news

संबंधित बातम्या

Supreme Court Of India: जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनचा वापर?   चौकशी समितीत बदलास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
1

Supreme Court Of India: जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनचा वापर?   चौकशी समितीत बदलास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Abhijeet Dipke On MPSC Protest: पेपरफुटीविरोधात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले; ‘CJP’चे अभिजित दीपकेंची मोठी घोषणा
2

Abhijeet Dipke On MPSC Protest: पेपरफुटीविरोधात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले; ‘CJP’चे अभिजित दीपकेंची मोठी घोषणा

देशातील आणखी एका मोठ्या पक्षाचे निवडणूक चिन्ह जाणार? सध्या ना कोणता आमदार, ना खासदार
3

देशातील आणखी एका मोठ्या पक्षाचे निवडणूक चिन्ह जाणार? सध्या ना कोणता आमदार, ना खासदार

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका
4

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.