नवी दिल्ली : देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्ली हत्याकांड (Shradhha walkar murder case) प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. नुकतीच त्याची एक पॅालिग्राफ चाचणी झाली. यानंतर त्यांन केलेलं वक्तव्य हे नक्कीच संताप आणणारं आहे. ‘आनंदानं फाशीला सामोर जाईल, स्वर्गात अप्सरा मिळेल’ असं वक्तव्य त्यांन केलं आहे.
[read_also content=”खोट्याची उंची कितीही उंच असली तरी सत्याच्या तुलनेत ते…अनुपम खेर यांच नदाव लॅपिड यांना प्रत्यु्त्तर https://www.navarashtra.com/movies/anupam-kher-answer-to-nadav-lapid-on-controversial-his-statement-about-kashmir-files-nrps-349400.html”]
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालावर (Aftab Poonawalla) काल दिल्ली इथं तलवारीनं हत्या करण्याचा प्रयत्न झाला. पॉलिग्राफ चाचणीनंतर परत येताना हा हल्ला झाला होता. या प्रकरणी दिल्लीच्या प्रशांत विहार पोलिस स्टेशनने हल्लेखोर निगम गुर्जर आणि कुलदीप यादव यांना अटक करण्यात आलं असून रात्रीच तिहार तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस गुरुग्राम आणि दिल्लीत शोध घेत आहेत.
श्रद्धा खून प्रकरणातील आरोपी आफताबला आज पुन्हा रोहिणी येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये आणण्यात आले आहे. अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये दिल्ली पोलिसांची टीम आफताबसोबत लॅबमध्ये पोहोचली आहे. सकाळी 11 वाजतापासून त्याची पॉलिग्राफ चाचणी करण्यात येत आहे.
आफताबची लवकरात लवकर नार्को टेस्ट घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. न्यायालयाने परवानगी दिली असून आफताबची 1 डिसेंबरला नार्को टेस्ट होणार आहे.