करारानंतर आता झाली कारवाई... LAC वर भारत आणि चीन यांच्यात संबंध सुधारण्यास प्रयत्न सुरु ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
LAC : करारानंतर पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) भारत आणि चीन यांच्यात संबंध सुधारणांसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. दोन्ही देशांच्या सैनिकांनी डेपसांग आणि डेमचोक भागातून माघार घ्यायला सुरुवात केली आहे. भारत आणि चीनने 21 ऑक्टोबर रोजी गस्त घालण्यावर सहमती दर्शवली होती. पूर्व लडाखमधील LAC वर भारत आणि चीन यांच्यात मतभेद सुरू झाले आहेत. दोन्ही देशांच्या सैनिकांनी डेपसांग आणि डेमचोक भागातून माघार घ्यायला सुरुवात केली आहे. करारानुसार, दोन्ही बाजूंनी प्रत्येकी एक तंबू आणि परिसरातील काही तात्पुरत्या बांधकामे पाडली आहेत. डेमचोकमध्ये, भारतीय सैनिक चार्डिंग नाल्याच्या पश्चिमेकडे परत जात आहेत तर चिनी सैनिक नाल्याच्या पलीकडे पूर्वेकडे परत जात आहेत.
हे देखील वाचा : जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर मोठा दहशदवादी हल्ला, ५ जवान गंभीर जखमी
दोन्ही बाजूला सुमारे 10-12 तात्पुरत्या इमारती बांधण्यात आल्या असून, दोन्ही बाजूला सुमारे 12-12 तंबू उभारण्यात आले आहेत, ते काढण्यात येणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या 4-5 दिवसांत देपसांग आणि डेमचोकमध्ये गस्त सुरू होण्याची शक्यता आहे. डेपसांगमध्ये चिनी लष्कराकडे तंबू नाहीत पण त्यांनी वाहनांच्या मध्ये ताडपत्री लावून तात्पुरता निवारा बनवला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपासून डेपसांग आणि डेमचोकमध्ये स्थानिक कमांडर स्तरावरील बैठका सुरू झाल्या. बुधवारी डेमचोकमध्ये दोन्ही बाजूंनी प्रत्येकी एक मंडप काढण्यात आला. गुरुवारी काही तात्पुरती बांधकामेही पाडण्यात आली. त्याचवेळी, गुरुवारी चिनी सैनिकांनी त्यांची काही वाहने येथून हटवली आहेत. भारतीय लष्कराने गुरुवारी येथून काही सैनिकांची संख्या कमी केली.
हे देखील वाचा : गांदरबल दहशतवादी हल्ल्याचा व्हिडिओ समोर; 7 जणांवर गोळीबार करणारे सर्व सीसीटीव्हीत कैद
BRICS मध्ये भारत -चीन
यावेळची मोदी-जिनपिंग यांची द्विपक्षीय बैठक अनेक अर्थांनी मागीलपेक्षा वेगळी होती. आजच्या काळात, जेव्हा जगाच्या दोन भागात युद्ध सुरू आहे, त्यापैकी एक रशिया आहे, जो ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. अशा परिस्थितीत आशियाई देशांचे दोन बलाढ्य नेते जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतील, तेव्हा त्याचा परिणाम जागतिक स्तरावर दिसून येईल. मात्र ही बैठक आणखी खास मानली जात आहे, कारण केवळ 2 दिवसांपूर्वीच भारत आणि चीनने सुरू असलेला सीमावाद संपवण्याची पुष्टी केली आहे. दोन्ही शेजारी आपापल्या हितसंबंधांबाबत अत्यंत गंभीर असल्याचा संदेशही यातून संपूर्ण जगाला गेला आहे.