गांदरबल दहशतवादी हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर; 7 जणांना ठार करणारे दहशतवादी फुटेजमध्ये कैद ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
जम्मू : गांदरबल दहशतवादी हल्ल्याच्या तपासादरम्यान, एका कथित दहशतवाद्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये संशयित फेरान परिधान करून एके रायफल घेऊन जाताना दिसत आहे. सुरक्षा यंत्रणांनी त्याची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे. हे फुटेज हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्याचे असले तरी अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दहशतवादी झोपडीत शिरताना दिसत आहे. ते गगनगीर बोगद्याच्या बांधकामाजवळ असल्याचे सांगितले जात आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी या फोटोची सत्यता तपासण्यास सुरुवात केली आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फुटेजमध्ये बंदूकधारी झोपडीत शिरताना दिसत आहे. ते गगनगीर बोगद्याच्या बांधकामाजवळ असल्याचे सांगितले जात आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी या फोटोची सत्यता तपासण्यास सुरुवात केली आहे. रायफलवर निळ्या रंगाचे चिन्ह आहे.
सूत्रांनी सांगितले की, पीर पंजालमध्ये सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांनी अशाच रायफल्सचा वापर केला होता. हल्ल्यातून बचावलेल्यांनी दावा केला आहे की, हल्लेखोरांनी आपले तोंड झाकले होते. त्याचवेळी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत गोळा केलेल्या पुराव्यांबाबत भाष्य करणे मुदतपूर्व ठरेल. याचा पुढील तपासावर परिणाम होऊ शकतो. पुष्टी झाल्यावर माहिती सामायिक केली जाईल.
हे देखील वाचा : भारताच्या पाणबुडी करारासाठी जर्मनी आणि स्पेनमध्ये स्पर्धा; भारताच्या निर्णयाची प्रतीक्षा
गोळीबारात सात ठार, टीआरएफने जबाबदारी घेतली
रविवारी रात्री दहशतवाद्यांनी गांदरबलमधील सोनमर्गजवळील गगनगीर भागात झेड मोड बोगदा बांधणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या मजुरांवर हल्ला केला, त्यात सहा मजूर आणि एका डॉक्टरचा मृत्यू झाला. अन्य काही कामगार जखमी झाले आहेत. त्यापैकी पाच प्रवासी मजूर आहेत. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संलग्न असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने (TRF) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
हे देखील वाचा : कॅनडाला भारतीय कामगार आणि विद्यार्थी नकोत? जाणून घ्या या सर्वेक्षणामुळे का वाढली ‘डोकेदुखी’
दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला
गांदरबलच्या गगनगीर गुंड भागात बोगदा बांधणाऱ्या ईपीसीओ या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कॅम्पपर्यंत पोहोचल्यानंतर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी एक काश्मिरी डॉक्टर आणि इतर चार मजुरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉ. शाहनवाज आणि फहीम नजीर, कलीम, मोहम्मद हनीफ, शशी अब्रोल, अनिल शुक्ला आणि गुरमीत सिंग अशी मृतांची नावे आहेत. त्यात गुरमीत पंजाबचा, अनिल मध्य प्रदेशचा आणि हनीफ, कलीम आणि फहीम बिहारचा होता.