अग्नि-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; 5000 किलोमीटरपर्यंत करू शकते अचूकपणे लक्ष्य
नवी दिल्ली : ओडिशातील चांदीपूर येथून अग्नि-5 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. या नव्या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून भारताने आपली संरक्षण क्षमता आणखी मजबूत केली आहे. हे क्षेपणास्त्र 5000 किलोमीटरपर्यंत अचूकपणे लक्ष्य करू शकते आणि त्यात MIRV तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे एकच क्षेपणास्त्र अनेक लक्ष्यांवर हल्ला करू शकते. यामुळे आता भारताची ताकद आणखी वाढणार आहे.
अग्नि-5 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली आहे. DRDO ने विकसित केलेले हे क्षेपणास्त्र आधुनिक नेव्हिगेशन, मार्गदर्शन आणि वॉरहेड तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहे. ज्या गोष्टीची पाकिस्तानच्या मनात धडकी बसली होती अखेर ते भारताने करून दाखवले. भारताने बुधवारी मध्यम अंतराची बॅलेस्टिक मिसाईल अग्नि-5ची यशस्वी चाचणी केली आहे. ओडिशातील चांदिपूर येथील इंटीग्रेटेड टेस्ट रेंज केंद्रात ही चाचणी झाली. पाकिस्तानमध्ये या मिसाईलची इतकी धडकी आहे की, चाचणीच्या एक दिवसाआधी इस्लामाबादच्या थिंक टँकने अग्नि-5 बाबत पाकिस्तानी सरकारला सतर्कतेचा इशारा दिला होता.
दरम्यान, अग्नि-5 बाबत पाकिस्तानच्या शहबाज शरीफ सरकारसोबत आर्मी चीफ असीम मुनीर यांना पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे थिंक टँक स्ट्रॅटेजिक व्हिजन इन्स्टिट्यूटने सावध केले होते. त्यामुळे पाकिस्तानात एकप्रकारे धडकी भरल्याचे पाहिला मिळत आहे.
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा
जर भारताने या मिसाइलची यशस्वी चाचणी केली तर ती पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा असू शकते. या क्षेपणास्त्राची रेंज 5000 किमीहून अधिक आहे, त्यामुळे पाकिस्तान चांगलाच घाबरला आहे. ही मिसाइल भारताच्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइल अग्नी ५ चा एक भाग आहे. त्याला भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केले आहे.
अनेक युद्धसामग्री नेण्याची क्षमता
अग्नि-५ मिसाईल अनेक युद्धसामग्री वाहून नेण्यास आणि एकापेक्षा जास्त लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहे. ते एमआयआरव्ही तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे म्हणजेच मल्टीपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल रीएंट्री व्हेईकल तंत्रज्ञान. ही क्षमता या मिसाइलला एक धोकादायक शस्त्र बनवते. याचा फायदा भारताला होणार आहे.