(फोटो सौजन्य: X)
अजब छंद! महिलेकडे 54 हॉन्टेड डॉल्स; खोडकर बाहुल्यांमुळे नाताळात घरात घडतात रहस्यमय घटना
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर एका लग्नसमारंभाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये वर आणि वधू चारचाकीत बसून मोठ्या थाटात लग्नमंडपात एंट्री घेत असल्याचे दिसून येते. यावेळी दोघांच्याही हातात एक फायर गन असते ज्यातून आग बाहेर पडते. दोघेही कारच्या ओपन विंडोत उभे राहून, हातात फायर गन घेऊन ती वर उंचावतात आणि त्यातून आगीचे पेटके बाहेर पडत असतात. वर-वधूची अनोखी एंट्री सर्वांचाच अवाक् करत असते पण तितक्यातच एक अपघात घडून येतो. फायर गनमधून अचानक स्फोट होतो आणि आग वधूच्या आणि वराच्या कपड्यांवर जाऊन पडते. व्हिडिओत आपल्याला वराच्या पगडीला आग लागल्याचे स्पष्ट दिसून येते जी नंतर वऱ्हाड्यांच्या मदतीने विझवली जाते. सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली आहे. थोडक्यात बचाव झाला असला तरी असा दिखावा जीवघेणा ठरू शकतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे.
💀 pic.twitter.com/5AmoaKwupP — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 21, 2025
धाकड छोरी! रस्त्यावर मुलीची छेड काढत होता व्यक्ती, तिने बांबू घेतला अन्… घटनेचा Video Viral
हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “क्षणांना अविस्मरणीय बनवण्याच्या प्रयत्नात, आपण स्वतःच एक आठवण बनून जातो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लग्नात हे सगळं थांबव, भावा. हे अजिबात चांगलं दिसत नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भव्य एंट्रीचे रूपांतर अयशस्वी एंट्रीत झाले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






