Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरुणाचलात काँग्रेसला मोठा फटका; एनपीपी, काँग्रेसजवळ उरला एक-एक आमदार

अरुणाचल प्रदेशातील चार आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे 2 तसेच नॅशनल पीपल्स पार्टीच्या 2 आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 27, 2024 | 12:28 PM
अरुणाचलात काँग्रेसला मोठा फटका; एनपीपी, काँग्रेसजवळ उरला एक-एक आमदार
Follow Us
Follow Us:

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील चार आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री पेमा खंडू (Pema Khandu) यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे 2 तसेच नॅशनल पीपल्स पार्टीच्या 2 आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे आमदार निनोंग एरिंग व वांगलिंन लाऊनदोंग भाजपमध्ये सहभागी झाले आहे.

नॅशनल पीपल्स पार्टीचे आमदार मुचू मिथी, गोकर बासर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर आता 60 आमदारांच्या विधानसभेत काँग्रेस तसेच नॅशनल पीपल्स पार्टीकडे प्रत्येकी 1-1 आमदार उरलेत.

भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे संख्याबळ 56 वर

60 सदस्यीय अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका एप्रिल किंवा मेमध्ये लोकसभा निवडणुकीसोबत होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी चार आमदारांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर राज्य विधानसभेतील एकूण 60 सदस्यांपैकी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांचे संख्याबळ 56 पर्यंत वाढले, तर काँग्रेसचे दोन कमी झाले. सभागृहात दोन अपक्ष सदस्यही आहेत.

राज्यात आमचा पाया मजबूत होईल 

चार आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री पेमा खांडू म्हणाले, “या 4 आमदारांनी पक्षात प्रवेश करणे हे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासाचा पुरावा आहे. पंतप्रधानांचे परिवर्तनवादी नेतृत्व म्हणजे ‘सबका साथ,’ ‘सबका विकास, सबका’ ‘विश्वास, सबका प्रयास’ या ब्रीदवाक्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ज्याने देशभरात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. त्यांच्या पक्षात प्रवेश केल्याने त्यांच्या संबंधित मतदारसंघात आणि अरुणाचल प्रदेशात आमचा पाया आणखी मजबूत होईल.

Web Title: Big blow to congress in arunachal pradesh nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2024 | 12:28 PM

Topics:  

  • Congress
  • maharashtra
  • Marathi News
  • political news

संबंधित बातम्या

Chandrapur News: धोकादायक इमारतीत शिक्षणाचा खेळ; भेगा पडलेल्या भिंती, उखडलेली फरशी… विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
1

Chandrapur News: धोकादायक इमारतीत शिक्षणाचा खेळ; भेगा पडलेल्या भिंती, उखडलेली फरशी… विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Diveagar Beach Picnic Accident: दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना!
2

Diveagar Beach Picnic Accident: दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना!

Pune : पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेती कर्जवसुलीला स्थगिती
3

Pune : पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेती कर्जवसुलीला स्थगिती

Maharashtra SIR 2026: मतदारांसाठी मोठा दिलासा! नोटीस आली तरी सुनावणीला जाण्याची गरज नाही; BLO घरी येऊन घेणार कागदपत्रे
4

Maharashtra SIR 2026: मतदारांसाठी मोठा दिलासा! नोटीस आली तरी सुनावणीला जाण्याची गरज नाही; BLO घरी येऊन घेणार कागदपत्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.