भाजप कितीही मोठा झाला तरी बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय पर्याय नाही; भाजपला भीती कशाची?
नितीशकुमार हे बिहारच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व मानले जातात. बिहारमध्ये गेल्या दोन दशकांपासून नितीश कुमार यांची सत्ता आहे. बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएने जागावाटप निश्चित केले आहे. जनता दल आणि भाजप यांना प्रत्येकी १०१-१०१ जागा मिळाल्या आहेत. तर एलजेपी(आरव्ही) ला २९ आणि एचएएम आणि आरएलएमला प्रत्येकी सहा जागा देण्यात आल्या आहेत. या जागावाटपात भाजप आणि जेडीयूला समान जागा मिळाल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आतापर्यंत जेडीयूने सातत्याने भाजपला मागे टाकले आहे
पण अलीकडे सोशल मीडियावर, आता बिहारमध्ये जनता दलाची “मोठा भाऊ” म्हणून नितीशकुमार यांची भूमिका संपली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने एनडीए सदस्यांना त्यांच्या स्वतःच्या आवडीनुसार तिकिट वाटप केलं आहे. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, भाजपला जेडीयुपेक्षा जास्त जागा मिळतील, अशी चिन्हे दिसत आहे. पण ते इतकेही सोपे नाही. जर नितीश कुमार यांचे आरोग्य चांगले असेल तर एनडीए किंवा महाआघाडीमध्ये त्यांच्या पदाला आव्हान देणारे दुसरे कोणीही नाही. म्हणजेच जर, एनडीएने विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवले तर नितीश कुमार यांचे स्थान सुरक्षित मानले जाऊ शकते.
RBI: आरबीआयचा मोठा निर्णय! आता इंटरनेटशिवायही होईल डिजिटल रुपयाने पेमेंट
१-नितीश कुमार यांची मुख्य मतपेढी कायमची भाजपकडे हस्तांतरित करणे
नितीश कुमार यांची मुख्य मतपेढी असलेल्या कुर्मी (४%), कोएरी (६%) आणि इतर ईबीसी (२७%) या विधानसभेतील मते ही बिहारमध्ये राजकीय पाठीचा कणा मानला जातो. २०२०च्या बिहार विधानसभा निवडणुकीत, जेडीयूने ४३ जागा जिंकल्या होत्या, परंतु त्यांचा मतांचा वाटा (१५%) हा एनडीएच्या एकूण ३७% पैकी एक महत्त्वाचा भाग होता. भाजपचा स्वतःचा मतांचा वाटा (२३%) उच्च जाती आणि शहरी मध्यमवर्गापुरता मर्यादित आहे.
नितीश कुमार यांचे वय लक्षात घेता, ही त्यांची शेवटची राजकीय खेळी असू शकते. जोपर्यंत नितीश कुमार मजबूत आहेत, तोपर्यंत जेडीयू टिकेल. पण ज्या दिवशी जर नितीश कुमार आरोग्याच्या कारणास्तव पक्षाच्या दैनंदिन राजकारणापासून दूर जातील त्या दिवशी पक्षात फूट पडेल, हे भाजपला चांगलेच माहिती आहे. अशा परिस्थितीत, नितीश कुमारांचे मुख्य मतदार म्हणजेच ईबीसी आणि महादलित मतदार, महाआघाडी (आरजेडी+काँग्रेस) किंवा प्रशांत किशोर यांच्या जनसूराजकडे जाण्याची शक्यताही आहे. त्यामुळे बिहारमध्ये भाजपसाठी पुन्हा अवघड परिस्थिती निर्माण होईल. म्हणूनच भाजप कधीही नितीश कुमार यांना सोडणार नाही.
महामार्गावरील घाणेरड्या शौचालयाचा फोटो पाठवा अन् जिंका Fastag मध्ये 1000 रुपये, NHAIची नवी योजना
भाजपच्या मित्रपक्षांशी असलेल्या संबंधांतील विश्वासार्हतेच्या कमतरतेचा मुद्दा बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या स्थितीला अधिक बळकटी देतो. उत्तर प्रदेशात भाजपने २०२२ मध्ये अपना दल आणि निषाद पक्षाला अपेक्षेपेक्षा कमी जागा देत त्यांच्याशी तणाव निर्माण केला. झारखंडमध्ये एजेएसयू आणि जेएमएमसोबतची युती तुटल्याने २०१९ च्या निवडणुकीत पक्षाला तोटा सहन करावा लागला. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याशी अशा प्रकारचा धोका पत्करणे भाजपसाठी जोखमीचे ठरू शकते.
जर भाजपने बिहारमध्ये निवडणुका जिंकल्यानंतर नितीश यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उत्तर प्रदेश आणि झारखंड सारख्या राज्यांमध्ये आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. भाजपचे मित्रपक्ष आधीच भाजपकडे संशयाच्या दष्टीने पाहत आहेत. त्यामुळे जर नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदे मिळाले नाही तर भाजपनेबिहारचा विश्वासघात केल्याचा संदेश देशभरात जाईल. नितीश यांना मुख्यमंत्री बनवून, भाजप आपण युतीधर्म पाळत असल्याची संदेश देऊ शकतात. पण २०२० मध्ये जद(यू) च्या ४३ जागा असूनही, नितीश यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. कारण त्यावेळी भाजपला जेडीयूची गरज होती. यावेळीही ही रणनीती २०२५ मध्येही तशीच राहू शकते.
Bihar Election Effect: बिहारींना खूष करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का
बिहारच्या राजकारणात नितीश कुमार हे एनडीएसाठी ‘संतुलन बिंदू’ आहेत. बिहारच्या राजकारणात जातीय समीकरणे आणि सामाजिक युती महत्त्वाची आहेत. नितीश कुमार यांची कुर्मी-ईबीसी-महादलिताच्या एकगठ्ठा मते एक महत्त्वाचे संतुलन साधतात. जी भाजप कधीही एकट्याने साध्य करू शकत नाही. २०२० मध्ये, जद(यू) कडे ४३ जागा होत्या, परंतु नितीश कुमारांच्या विश्वासार्हतेमुळे एनडीएला १२५ जागा जिंकता आल्या. जेडीयुने जागा गमावल्या तरी, नितीश कुमारांची विश्वासार्हता आणि युतीतील त्यांची भूमिका एनडीएला बहुमत देऊ शकते. एचएएमचे जितन राम मांझी यांनीदेखील, नितीश कुमार यांच्याशिवाय एनडीएचे संतुलन बिघडू शकते. नितीश कुमारांच्या कमी झालेल्या जागांमुळे भाजजपवर दबाव आणू शकतात, परंतु त्यांच्या जागी दुसरा मुख्यमंत्री आणल्यास एनडीए अस्थिर होईल, अशी शक्यताही वर्तवली आहे.
बिहार भाजपसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे नितीश कुमार यांच्या जागी स्वीकारार्ह नेतृत्वाचा अभाव. पक्षातील सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा या दोघांनाही नितीश कुमार यांची राज्यभरात असलेली व्यापक स्वीकृती नाही, तसेच ईबीसी (अतिपिछडे वर्ग) आणि महादलित मतदारांना आकर्षित करण्याची क्षमता त्यांच्यात दिसत नाही. सध्या भाजपची मतदारसंख्या सुमारे २३ टक्क्यांवर स्थिर असून ती प्रामुख्याने उच्चवर्णीय (भूमिहार, राजपूत) आणि शहरी मध्यमवर्गीय मतदारांपुरती मर्यादित आहे.
काही विश्लेषक महाराष्ट्रातील राजकीय समीकरणाचा दाखला देत आहेत. ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले, त्याच धर्तीवर बिहारमध्येही असे काही घडू शकते, अशी चर्चा आहे. मात्र, नितीश कुमार हे “एकनाथ शिंदे नाहीत” आणि बिहार भाजपकडे “देवेंद्र फडणवीससारखा नेता” नाही, असेही मत मांडले जात आहे.
‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वरील एका सर्वेक्षणात विचारले गेले, “नितीश कुमार यानंतर भाजपचा मुख्यमंत्री कोण होईल?” त्यावर तब्बल ६० टक्के लोकांनी उत्तर दिले — “कोणीही नाही.” विश्लेषकांच्या मते, जर भाजपने नितीश कुमार यांना बाजूला ठेवून स्वतःचा मुख्यमंत्री पुढे केला, तर पक्षाला ईबीसी आणि महिला मतदारांचा मोठा पाठिंबा (सुमारे ५०%) गमवावा लागू शकतो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार यांनी NDA ला ३० ते ४० जागा मिळवून दिल्या होत्या. त्यांच्या अनुपस्थितीत तेजस्वी यादव यांची “युवा” प्रतिमा आणि “नोकरी” ही घोषणा एनडीएच्या मतांवर परिणाम करू शकते.
दिवाळीनिमित्त खरेदी करा सुंदर आणि आकर्षक डिझाईनच्या मीनाकारी बांगड्या! हातांची वाढेल शोभा
भाजपला नितीश कुमार यांच्या “राजकीय यू-टर्न”च्या इतिहासाची चांगलीच जाणीव आहे. २०१३ मध्ये त्यांनी भाजपपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला; २०१५ मध्ये त्यांनी राजदसोबत हातमिळवणी केली; २०१७ मध्ये पुन्हा एनडीएमध्ये परतले; आणि २०२२ मध्ये पुन्हा महाआघाडीत सामील झाले.
२०२४ मध्ये त्यांनी पुन्हा एनडीएमध्ये प्रवेश करताना “आता कोणताही बदल होणार नाही” असे आश्वासन दिले असले, तरी भाजपला त्यावर पूर्ण विश्वास नाही. कारण नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद न दिल्यास ते पुन्हा महाआघाडीकडे वळू शकतात — आणि महाआघाडी त्यांना पुन्हा स्वीकारण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वीही कमी आमदारसंख्या असूनही महाआघाडीने नितीश कुमार यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे, ‘X’वरील एका वापरकर्त्याच्या शब्दांत — “भाजपला नितीशकडून पुन्हा एकदा पलटीची भीती वाटते.”