अहमदाबाद विमान दुर्घटनेची चौकशी होणार (फोटो - ani)
अहमदाबाद: दोन दिवसांपूर्वी अहमदाबादच्या मेघानीनगर येथे लंडनला जाणारे विमान कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 242 पैकी 241 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक प्रवासी बचावला आहे. दरम्यान विमानाने उड्डाण करताच काही मिनिटांत हे विमान बीजे मेडिकलच्या इमारतीवर जाऊन कोसळले. दरम्यान हा अपघात कशामुळे झाला याचा तपास सुरू झाला आहे.
अहमदाबाद येथील विमान अपघाताची चौकशी केंद्रीय गृह सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती या दुर्घटनेची चौकशी करणार आहे. तसेच भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून एसओपी देखील तयार केली जाणार आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने देखील याबाबत एसओपी जारी करणार असल्याचे सांगितले आहे.
ही समिती आपला रिपोर्ट तयार करून तीन महिन्यात नागरी उड्डाण मंत्रालयाला सादर करणार आहे. 12 जून रोजी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतले होते. उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच विमान कोसळले.
या घटनेची चौकशी अनेक तपास यंत्रणा करत आहेत. एटीएस देखील या घटनेचा तपास करत आहे. विमानातून ब्लॅक बॉक्स आणि डीव्हीआर जप्त केला आहे. त्यामुळए लवकरच हा अपघात नेमका कशामुळे घडला आहे, याचे कारण समोर येणार आहे.
अकोल्याच्या ऐश्वर्याने सांगितला भयानक प्रसंग
गुजरातमधील विमान अपघातात अकोल्याची ऐश्वर्या थोडक्यात बचावलीय. विमान कोसळलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये ती द्वितीय वर्षाला शिकत आहे. तर पाचव्या मजल्यावरून धुरामधून वाट काढत स्वत:भोवती ब्लँकेट लपेटून तिने स्वतःचा जीव वाचवला आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे बुधवारी झालेल्या भीषण विमान अपघातात अकोल्याची मुलगी ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली आहे. तर या अपघाताच्या वेळी ती हॉस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर झोपलेली होती. अचानक मोठा आवाज झाला आणि सर्वत्र धुराचे लोट पसरले. आणि त्या परिस्थितीतही ऐश्वर्याने धीर न सोडता धुराच्या गर्दीतून वाट काढत स्वतःचा जीव वाचवला आहे.
Ahmedabad Plane Crash: झोपेत असताना हॉस्टेलवर विमान क्रॅश झाले अन्…; अकोल्याच्या ऐश्वर्याने सांगितला भयानक प्रसंग
तर ऐश्वर्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथे डीएम अँकोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. तर ती आपल्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून अकोल्याहून अहमदाबादला परतली होती. तर झोपेत असताना ती अचानक मोठ्या आवाजाने जागी आली. आणि उठून पाहिलं तर सर्वत्र धुराच धूर होता. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येताच तिने स्वतःला ब्लँकेटमध्ये लपेटलं आणि अंधार व धुराच्या गर्दीतून मार्ग शोधत पाचव्या मजल्यावरून खाली उतरून स्वतःचा जीव वाचवला. या दरम्यान तिच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर भाजले असल्याने जखमा झाल्या आहेत.