केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे, आधार आणि मतदान ओळखपत्र एकमेकांशी संलग्न केल्याशिवाय त्यांचे नाव मतदार यादीत येणार नल्याची चर्चा काही दिवसांपासून होती. परंतू, आधार आणि मतदान ओळखपत्र एकमेकांशी लिंक नसेल तर अशा मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार नाही, असे केंद्र सरकारने शुक्रवारी (16 डिसेंबर) स्पष्ट केले आहे. आधार आणि मतदान ओळखपत्र एकमेकांशी संलग्न केल्याशिवाय त्यांचे नाव मतदार यादीत येणार नल्याची चर्चा काही दिवसांपासून होती.
केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजीजू यांनी संसदेत माहिती देताना सांगितले की, निवडणूक कायदे (सुधारणा) कायदा, 2021, निवडणूक नोंदणी अधिकार्यांना विद्यमान किंवा संभाव्य मतदाराला “ऐच्छिक आधारावर ओळख प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने” आधार क्रमांक प्रदान करण्याची परवानगी देतो, असे कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत सांगितले. आधार आणि मतदान ओळखपत्र संलग्न करण्याबाबत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात रिजजू संसदेत बोलत होते. निवडणूक आयोगाने 1 ऑगस्टपासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विद्यमान आणि संभाव्य मतदारांचा आधार क्रमांक संकलित करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे.
तथापि, मंत्र्यांनी स्पष्ट केले की आधार तपशील सामायिक करण्यासाठी “संमती मागे घेण्याची कोणतीही तरतूद नाही”. ज्या मतदारांची मतदार ओळखपत्रे आधारशी जोडलेली नाहीत त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जातील का, असे विचारले असता त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. राज्यसभेत माहिती देताना, सुमारे 95 कोटी एकूण मतदारांपैकी 54 कोटींहून अधिक मतदारांनी त्यांचे आधार तपशील मतदार यादीशी जोडण्याचा पर्याय निवडला आहे, असेही सांगितले.






