टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र सरकारचा पुढाकार:
गेल्या तीन वर्षांत राबविण्यात आलेल्या सार्वजनिक-खाजगी-समुदाय सहभागाच्या जलसंधारण उपक्रमांतर्गत १,४५० हून अधिक जलसाठ्यांचे संवर्धन करण्यात आले असून ३,००० कोटी लिटरहून अधिक जलसाठवण क्षमता निर्माण झाली आहे. या उपक्रमाचा लाभ सुमारे सात लाख ग्रामीण नागरिकांना झाला आहे.
लवकरच मार्केटमध्ये एंट्री मारणार Maruti Grand Vitara 2026, जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि फीचर्स
या उपक्रमाचा पुढील टप्पा नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण विभागात राबविण्यात येणार आहे. पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये वर्षभर पाणी उपलब्ध करून देणे, भूजल पातळी वाढविणे आणि सिंचन सुविधा सुधारणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेच्या माध्यमातून विकेंद्रित आणि समुदाय-केंद्रित उपाययोजना राबवून दीर्घकालीन जलसुरक्षा निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. टाटा मोटर्सचा सहभाग हा राज्याच्या जलव्यवस्थापन प्रयत्नांना अधिक गती देणारा आहे.
टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी सांगितले की, शाश्वत जलउपाययोजनांसाठी सरकारी योजना, समुदायाचा सहभाग आणि दीर्घकालीन सहयोग यांवर कंपनीचा भर आहे. अंमलबजावणीसाठी Naam Foundation सोबत भागीदारी करण्यात आली आहे.
Kawasaki Bikes खरेदी करण्याची गोल्डन संधी! लाखो रुपयांची बचत होणार, जाणून घ्या Discount Offer
एकट्या २०२५ मध्ये कंपनीने २५ जिल्ह्यांमध्ये १,००० जलसाठ्यांचे संवर्धन करून २,२५० कोटी लिटर अतिरिक्त जलसाठवण क्षमता निर्माण केली. यामुळे टँकरवरील अवलंबित्व कमी झाले असून पिण्याचे व सिंचनाचे पाणी उपलब्ध झाले आहे. अनेक शेतकरी एकाऐवजी दोन पिके घेऊ लागले आहेत, तर महिलांची पाण्यासाठी होणारी दैनंदिन धावपळ कमी झाली आहे.






