Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Central Govt Cabinet Decision : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ४ सरकारी योजनांची नावं बदलली, इंदिरा गांधींचं नाव योजनेतून हटवलं!

Central Govt Cabinet Decision : केंद्र सरकारने चार सामाजिक कल्याण योजनांची नावे बदलल्याची माहिती समोर आली आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा आणि दिव्यांग निवृत्तीवेतन योजनांसह राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेला नवी नावे देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या बदलांचा लाभार्थ्यांवर काय परिणाम होणार, याकडे लक्ष लागले आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 14, 2026 | 06:35 PM
PM Narendra Modi

PM Narendra Modi

Follow Us
Follow Us:
  • ४ योजनांची नावं बदलली?
  • पेन्शन योजनांची नवी नावं
  • लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट
Central Govt Cabinet Decision : केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून केंद्राच्या सामाजिक कल्याण योजनांबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे. केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या विधवा, दिव्यांग आणि वृद्धापकाळ निवृत्तिवेतनाच्या योजनांची नावं बदलण्यात येणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे नावदेखील आता बदलण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे या योजनांच्या नावांमधील माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या नावाचा उल्लेख हटवण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (NSAP) 2026-27 ते 2030-31 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी सुरू ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या कार्यक्रमासाठी एकूण 53,428 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या कार्यक्रमांतर्गत योजनांची आणि उपयोजनांची नावे बदलणे, दिव्यांग व्यक्तींच्या निवृत्तिवेतनासाठी पात्रतेचे निकष, लाभार्थ्यांची व्याप्ती आणि अर्थसहाय्याच्या रकमेत बदल करणे, तसेच वृद्ध आणि विधवा व्यक्तींसाठीच्या निवृत्तिवेतन योजना आणि कुटुंब लाभ योजना सध्याच्या स्वरूपात सुरू ठेवणे, या प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली आहे.

राज्य सरकारी विभागांत मोठा घोटाळा; तब्बल 700 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी चौघांना अटक, CBI ची कारवाई

कोणत्या योजनांची बदलणार नावं?

राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम या योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री सामाजिक सहायता योजनाकरण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

वृद्धापकाळ पेन्शन योजनेचे नाव बदलले

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री वृद्धावस्था पेन्शन असे करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतनाच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते.

विधवा पेन्शन योजनेला नवे नाव

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री विधवा पेन्शन योजना असे करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. पतीचे निधन झालेल्या पात्र महिलांना आर्थिक आधार देणे हा अशा सामाजिक सुरक्षा योजनांचा मुख्य उद्देश आहे.

दिव्यांग पेन्शन योजनेतही बदल

इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेचे नाव बदलून दिव्यांगजन पेन्शन योजना असे करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिव्यांग नागरिकांना आर्थिक मदत देणाऱ्या या योजनेतदेखील बदल करण्यात आला आहे.

दिव्यांग व्यक्तींच्या निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत 0 ते 79 वर्षे वयोगटातल्या लाभार्थ्यांना आता दरमहा 375 रुपये, तर 80 वर्षे आणि त्यापुढील वयोगटातल्या लाभार्थ्यांना दरमहा 625 रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

योजनेत होणार पुढील बदल 

  • योजनेअंतर्गत मानक दिव्यांगत्वाच्या पात्रतेसाठीचे प्रमाण सध्याच्या 80 टक्क्यांवरून 40 टक्के करण्यात आले आहे.
  • दिव्यांग निवृत्तिवेतनासाठीचे किमान वयाचे पात्रतेचे बंधन जन्मापासून लागू होणार आहे.
  • वृद्ध आणि विधवा व्यक्तींसाठीच्या निवृत्तिवेतन योजना, तसेच कुटुंब लाभ योजना सध्याच्या स्वरूपात सुरू राहतील.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे नावही बदलले

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री परिवार लाभ योजना असे करण्यात येणार असल्याचं सांगितले जात आहे. कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पात्र कुटुंबाला आर्थिक मदत देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

लाभार्थ्यांना काय फायदा होणार?

या चार योजनांच्या नावांमध्ये बदल होणार असल्याची माहिती समोर आली असली, तरी केवळ नाव बदलल्यामुळे लाभाची रक्कम, पात्रतेचे निकष किंवा अर्ज प्रक्रिया देखील बदलणार असे नाही.

या निर्णयाचा देशातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या एकूण 3.20 कोटी लाभार्थ्यांना फायदा होणार आहे.

अंमलबजावणीचे धोरण आणि उद्दिष्ट

दिव्यांग निवृत्तिवेतन योजनेच्या पात्रतेचे निकष, लाभार्थ्यांची संख्या आणि अर्थसहाय्याची रक्कम यांमधील बदलांचा समावेश असलेली मार्गदर्शक तत्त्वे 3 महिन्यांच्या आत जारी करून त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

इंदिरा गांधींचे नाव हटवल्याने होणार नवा वाद?

इंदिरा गांधींचे नाव या योजनांमधून हटवले जाणार असल्याने आता वादाची ठिणगी पडण्याची शक्यता असून यावर विरोधक काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याआधीदेखील काँग्रेस सरकारच्या काळात बनवण्यात आलेल्या योजनांची नावं बदलल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा काँग्रेस सरकारकडून निर्माण केलेल्या योजनांची नाव बदलण्यात येणार असल्यामुळे पुन्हा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोठी बातमी ! तांदळाची निर्यात आता लवकरच थांबणार; किरकोळ किमतीत 10 टक्क्यांची वाढ

Web Title: Central govt cabinet decision renames four social welfare schemes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • Cabinet Decision
  • Central government

संबंधित बातम्या

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 18 हजारांचा पगार थेट 69 हजारांवर जाणार? कसं ते जाणून घ्या…
1

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 18 हजारांचा पगार थेट 69 हजारांवर जाणार? कसं ते जाणून घ्या…

Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीत 3 मोठे निर्णय, आता सरकारी भूखंडाचे नियम बदलणार… शेतकऱ्यांसाठीदेखील घेतला मोठा निर्णय!
2

Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीत 3 मोठे निर्णय, आता सरकारी भूखंडाचे नियम बदलणार… शेतकऱ्यांसाठीदेखील घेतला मोठा निर्णय!

‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 4-4 हजार रुपये; PM Kisan योजनेच्या हप्त्यापूर्वी मोठी बातमी! असे तपासा ताजे अपडेट
3

‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 4-4 हजार रुपये; PM Kisan योजनेच्या हप्त्यापूर्वी मोठी बातमी! असे तपासा ताजे अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.