मुंबई : उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) लोकसभेच्या रिंगणात आहेत. उत्तर मुंबई लोकसभा जागेसाठी 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभुमीवर पियुष गोयल आपल्या मतदारसंघात फिरून जनसंवाद करत आहेत. दरम्यान, पियुष गोयल यांच्याबाबत सोशल मीडिया आणि काही बातम्यांमध्ये दावा करण्यात आला आहे की, पियुष गोयल जेव्हा मच्छी बाजारात गेले तेव्हा त्यांनी मासळीचा वास सहन न झाल्याने नाकावर रुमाल लावला होता. मात्र, व्हायरल होत असलेल्या या बातमीवर पियुष गोयल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रिपोर्टनुसार, ही फेकन्यूज असल्याचा दावा पक्षाच्या सूत्रांनी केला आहे.
[read_also content=”सलमान खान गोळीबार प्रकरणी वेगानं तपास, आधी बंदूक जप्त; आता शूटर्सला बंदूक पुरवणाऱ्यांना पंजाबमधून अटक! https://www.navarashtra.com/movies/mumbai-crime-brand-arrested-two-man-who-provide-guns-to-shooter-in-salman-khan-house-firing-case-527299.html”]
ही निव्वळ अफवा
पक्षातील सूत्रांनुसार, ही फेकन्यूज असून विरोधी पक्षातील काही लोक पियुष गोयल यांची बदनामी करण्यासाठी हे सगळ करत आहेत. ज्या रिपोर्टमध्ये पियुष गोयल यांची ही खोटी बातमी दाखवली जात आहे, त्यामध्ये तारीख किंवा वेळेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. पियुष गोयल यांच्या सर्व प्रवासाचे आणि भेटींचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आल्याचा दावा पक्षाच्या सूत्रांनी केला आहे की, पियुष गोयल यांच्याबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या बातम्या या अफवांपेक्षा काही नाही.
मच्छिमार बांधवांच काय म्हणणं?
या सर्व प्रकारवरुन वेगवेगळी मते असताना याबाबत मच्छिमार बांधवाना विचारलं असता ते म्हणाले की, मंत्री पियुष गोयल मच्छी बाजारात आलेच नाही. जर आले असते तर आम्ही धुमधडाकानं स्वागत केलं असतं असंही मच्छिमार बांधव म्हणालेत.
सेलिब्रिटी आणि राजकारणी फेकन्यूज बळी पडत आहेत
यापुर्वी अभिनेता आमिर खान आणि आणि अभिनेता रणबीर सिंगही फेक न्यूजला बळी पडले आहेत. सेलेब्रिटीनंतर आता राजकारणीही फेक न्यूजला बळी पडत असल्याचं समोर येत आहे. यावेळी ट्रोलर्सनी फेक न्यूजद्वारे प्रभावशाली लोकांना बदनाम करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे आणि याद्वारे ते सेलिब्रिटी आणि राजकारण्यांना लक्ष्य करत आहेत, असं दिसत आहे.
Web Title: Central minister piyush goyal reaction on his fake news getting viral on social media about fish market nrps