Photo Credit- social media
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार असेल,त्याच पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी देण्याचा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. पण या फॉर्म्यल्यामुळे अनेक इच्छुकांच्या नाराजीलाही महायुतीतील पक्षनेतृत्त्वाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक बड्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचा रस्ता धरल्याचीही बातमी समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.
पुण्यातील बापू पाठारे, भुईंजचे मदन भोसले, कागलचे समरजित घाटगे, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, पंढरपूरचे प्रशांत परिचारक आणि अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पडग्यामागे चर्चाही सुरू झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच कागलच्या समरजित घाटगे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर इंदापूरचे हर्षवर्धन पाटील हेदेखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणाच्या तयारीत असून ते कोणत्याही क्षणी भाजप सोडून तुतारी हाती घेऊ शकतात, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हेदेखील वाचा: ‘ती ओरडत होती म्हणून तिचा गळा दाबला’, त्या रात्री महिला डॉक्टरची हत्या कशी झाली?
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याला विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. अद्याप महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जाहीर झालेली नसली तर राजकीय वर्तुळात मोठमोठ्या घडामोडींना वेग येऊ लागला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय समीकरणेही बदलली आहेत. त्यामुळे महायुतीतील अनेक दिग्गज नेते आता पुन्हा महाविकास आघाडीकडे परतण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जाणार कागलचे समरजित घाडगे-पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच तुतारी हाती घेतली. त्यामुळे घाडगेंनी मोकळ्या करून दिलेल्या वाटेने आगामी काळात अनेक बडे नेते परतीच्या प्रवासाला लागतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
1.पुणे: पुणेजिल्ह्यातील इंदापूर विधानसभेतून अजित पवारांच्या गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश कऱण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवणे किंवा हातात तुतारी घेणे हो दोन पर्याय ठेवले आहेत.
हेदेखील वाचा: कॅनडापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा विद्यार्थी, नोकरदारांना मोठा झटका; नवे निर्बंध लागू
2. पुणे: पुण्यातील वडगाव शेरीचेय माजी आमदार आणि भाजप नेते बापू पठारेंची काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी काही दिवसांपूर्वी घरी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे पुण्याचे आमदार सुनील टिंगरे यांच्या विरुद्ध बापू पठारेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
3. सातारा: खंडाळ्याचे भाजपचे माजी आमदार मदन भोसले हेदेखील तुतारी हातात घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मदन भोसले यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे विधानसभेत मकरंद पाटलांच्या विरोधात त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
4. फलटण: फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या पाठींब्यावर निवडणून आलेले आमदार दीपक चव्हाण हेदेखील केव्हाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा: तरुणीची निर्घृण हत्या; धारदार शस्त्राच्या सहाय्याने डोकं, हात, पाय, धड कापले अन्…, पुण्यातील धक्कादायक प्रकार
5. सांगोला विधानसभा मतदारसंघातूनशिंदे सेनेच्या शहाजीबापू पाटील यांची उमेदवारी महायुतीकडून निश्चित मानली जात आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले अभिजित पाटील हेदेखील शरद पवार यांच्याकडे जाऊ शकतात.
6. याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे हे देखील तुतारी हातात घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा सुरू आहे.
7. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याही नाराजीचा चर्चा सुरू आहेत. त्यामुळे तेही माढा विधानसभा मतदारसंघातून तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतात.
8. माढा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांच्याही गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्याशी गाठी-भेटी वाढल्या आहेत. त्यामुळे शिंदे हेदेखील शरद पवाराकडे जाण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा: हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या भेटीला; पक्षांतराच्या घडामोडींना वेग?
9. विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक हेदेखील कधीही हातात तुतारी घेऊ शकतात. तसे झाल्यास विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कागलचे समरजित घाडगे यांनी भाजपची साथ सोडच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर कोल्हापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हेदेखील काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.राधानगरी- भुदरगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी राहुल देसाईंनी नुकताच भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा त्यासाठी राजीनामा दिला होता.