Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Himachal Pradesh Rain : हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस; चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प

पांडोह धरणाजवळील कात्री वळणाजवळ राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे कोसळला आहे. आता याठिकाणी पायी जाणेही कठीण बनले आहे. बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गाचा मोठा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 28, 2025 | 11:43 AM
राजधानी दिल्लीत पावसाचा हाहा:कार; महापुरामुळे जनजीवन विस्कळीत, यमुना नदीचे पाणी...

राजधानी दिल्लीत पावसाचा हाहा:कार; महापुरामुळे जनजीवन विस्कळीत, यमुना नदीचे पाणी...

Follow Us
Close
Follow Us:

चंदीगड : महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरसह इतर राज्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यात जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात अतिमुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसाचा फटका हिमाचल प्रदेशातील चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गला बसला. हे मार्ग पुन्हा बंद करण्यात आले. आता हा महामार्ग पूर्ववत कधी होईल, हेही सांगणे कठीण झाले आहे. याचा फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे.

पांडोह धरणाजवळील कात्री वळणाजवळ राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे कोसळला आहे. आता याठिकाणी पायी जाणेही कठीण बनले आहे. बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गाचा मोठा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. बानालाजवळील टेकडीवरून मोठी दरड पडल्याने बुधवारी रात्री महामार्ग आधीच बंद करण्यात आला होता. नऊ माईलजवळ मोठी मालवाहू वाहने थांबवण्यात आली होती. बानाला येथे महामार्ग पूर्ववत करण्यात येणार होता. मात्र, त्यापूर्वी कात्री वळणाजवळ हा महामार्ग मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. याचा फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे.

हेदेखील वाचा : Himachal Pradesh Rain: हिमाचलमध्ये बियास नदीचे तांडव; भयंकर प्रवाहामुळे लेह हायवेच…; 50 किमी पर्यंत वाहतूक कोंडी

दरम्यान, बानाला हा महामार्ग द्वाद्याजवळ तीन दिवसांनी पूर्ववत करण्यात आला होता. तर मंडी ते कुल्लू मार्गे काटोला मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला. लहान वाहने एका तासाच्या अंतराने सोडली जात आहेत. आता कुल्लू-मनालीसाठी हा एकमेव मार्ग शिल्लक आहे. या मार्गावर मोठा ताण जाणवू लागला आहे.

2023 मध्येही 8 महिने बंद होता मार्ग

ज्या ठिकाणी महामार्ग आता पाण्याखाली आहे, त्याच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या ठिकाणी, २०२३ च्या आपत्तीतही असेच दृश्य दिसून आले होते. त्यावेळी महामार्गाचा मोठा भाग कोसळला आणि तो पांडोह धरणात बुडाला. महामार्ग पुन्हा बांधण्यासाठी आणि येथे तो पूर्ववत करण्यासाठी आठ महिने लागले. जुना मार्ग वाहतुकीसाठी दुरुस्त करून तो पूर्ववत करण्यात आला. परंतु आता जिथे बुडाला आहे, तिथे असा कोणताही मार्ग असण्याची शक्यता नाही.

Web Title: Chandigarh manali national highway closed again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 11:43 AM

Topics:  

  • Climate Change
  • Heavy Rain
  • Himachal Pradesh
  • Weather Update

संबंधित बातम्या

Maharashtra Government: “आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी मदत पॅकेज आणि…”; मदत व पुनर्वसन मंत्री काय म्हणाले?
1

Maharashtra Government: “आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी मदत पॅकेज आणि…”; मदत व पुनर्वसन मंत्री काय म्हणाले?

India Weather Update: ‘कुठे भयंकर पाऊस तर कुठे…’; अनेक राज्यांमध्ये IMD ने दिला ‘हा’ इशारा
2

India Weather Update: ‘कुठे भयंकर पाऊस तर कुठे…’; अनेक राज्यांमध्ये IMD ने दिला ‘हा’ इशारा

राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस; दिल्ली-एनसीआरमध्ये तापमानात 8 अंशांनी घट
3

राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस; दिल्ली-एनसीआरमध्ये तापमानात 8 अंशांनी घट

Maharashtra Rain Alert: ‘शक्ती’ चक्रीवादळ महाराष्ट्राला रडवणार! कोकणात धुमशान अन्…; IMD ने दिला ‘हा’ इशारा
4

Maharashtra Rain Alert: ‘शक्ती’ चक्रीवादळ महाराष्ट्राला रडवणार! कोकणात धुमशान अन्…; IMD ने दिला ‘हा’ इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.