हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस (फोटो- ani)
मनाली: देशभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. हिमाचल प्रदेशमध्ये तर पावसाने कहर केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी ढगफुटी देखील झाली आहे. त्यामुळे अजूनही पाऊस सुरू असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मनालीमधील बियास नदीला महापूर आला आहे. बियास नदीचा प्रवाह इतका वेगवान आहे की त्यामध्ये लेह हायवेचा एक भाग वाहून गेला आहे.
हवामान विभागाने हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कुल्लू, मंडी, मनाली येथे पाऊस सुरूच आहे. मात्र बियास नदीच्या प्रवाहाने लेह हायवेचा एक भाग वाहून गेला आहे. त्यामुळे जवळपास 50 किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. 50 किलोमीटर इतकी भली मोठी वाहनांची रांग लागली आहे.
हायवेचा एक भाग गेला वाहून
बियास नदीच्या प्रवाहाने कुल्लू जिल्ह्यातील मनालीमध्ये एक हॉटेल आणि काही दुकाने देखील वाहून गेली आहेत. तसेच चंदीगड आणि मनालीला जोडणारा हायवेला अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. 50 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. अनेक पर्यटक अडकून पडले आहेत.
उत्तर भारतात पावसाचा कहर
राजधानी दिल्लीत देखील पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीसह आजूबाजूच्या परिसरात आज पावसाचा जोर वाढू शकतो. तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब व हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
India Rain Alert: उत्तर भारतात पावसाचा कहर! आज ‘या’ राज्यांना झोडपणार, IMD च्या अलर्टने वाढली चिंता
उत्तराखंड राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. देहराडुन, नेनीताल आणि बागेश्वर या भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. उद्या आणि परवा या राज्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हिमाचलमध्ये बियास नदीचे तांडव
देशभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. हिमाचल प्रदेशमध्ये तर पावसाने कहर केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी ढगफुटी देखील झाली आहे. त्यामुळे अजूनही पाऊस सुरू असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मनालीमधील बियास नदीला महापूर आला आहे. बियास नदीचा प्रवाह इतका वेगवान आहे की त्यामध्ये लेह हायवेचा एक भाग वाहून गेला आहे.