29 Naxalites killed in Kankore in front of Lok Sabha

  छत्तीसगढ : लोकसभेचे बिगूल वाजले आहे आणि देशभर प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. देशात १९ एप्रिलच्या दिवशी लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडणार आहे. त्याआधी त्तीसगडच्या कांकोरमध्ये सीआरपीएफचे जवान आणि नक्षली यांच्यात चकमक झाली. या चकमकीत 29 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. छोटे बेठीया ठाण्याच्या माड भागात ही चकमक सुरु आहे. बस्तर प्रदेशात असलेल्या छत्तीसगडच्या कांकेर येथे झालेल्या चकमकीत एकूण 29 नक्षलवादी ठार झाले आणि तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

  बस्तरचे आयजी पी. सुंदरराज यांनी काय म्हटलं
  कांकोर येथे चकमक झाली आहे. आम्ही नक्षलवाद्यांच्या विरोधात जवानांनी मोहीम सुरु केली आहे. नक्षलवाद्यांच्या विरोधात जी कारवाई आम्ही केली त्यात आत्तापर्यंत १८ नक्षल्यांचा खात्मा केला आहे. मारल्या गेलेल्या १८ नक्षलवाद्यांमध्ये शेखर, ललिता आणि राजू या दीर्घकाळापासून नक्षलवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या नक्षल्यांचाही खात्मा करण्यात आला आहे. १८ नक्षलवाद्यांना ठार केल्यानंतर एके ४७, एसएलआर, 303 अशा बंदुका आणि दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे. चकमक अद्यापही सुरु आहे. आमचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशी माहिती सुंदरराज यांनी दिली.

  कांकेर जिल्ह्यातील छोटेबेटिया पीएस सीमा भागात शोध मोहिमेसाठी कांकेर डीआरजी आणि बीएसएफ यांचा समावेश असलेले संयुक्त शोध पथक सुरू करण्यात आले,” पोलिसांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, दुपारी २ च्या सुमारास कांकेर जिल्ह्यातील छोटेबेटिया पोलीस स्टेशन परिसरातील बिनागुंडा-कोरागुट्टा जंगलांचा समावेश असलेल्या नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला.

  CRPF ने दिलेल्या माहितीनुसार या चकमकीत नक्षलवाद्यांचा कमांडर शंकरही मारला गेला आहे. शंकरवर २५ लाखांचं इनाम होतं. या ठिकाणाहून पोलिसांनी २५ एके ४७ रायफल्स दोन एलएमजी आणि काही 303 बंदुका तसंच मोठ्या प्रमाणावर दारुगोळाही जप्त केला आहे.

  १६ एप्रिलच्या दिवशी कांकोरमध्ये संयुक्त अभियान सुरु करण्यात आलं. पोलीस आणि सीआरपीएफचे जवान यात होते. कांकोरच्या बीनागुंडा गावात ही मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी सुरु झालेल्या चकमकीत आत्तापर्यंत १८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.