Top Marathi News Today Live
Marathi Breaking News Updates : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींच्या भेटीगाठी वाढल्याचेही दिसून आले होते. आता बिनविरोध निवडणुकीमुळे चर्चेत असलेल्या विधान परिषदेच्या राज्यातील ११ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होत आहे. सकाळी आठ ते संध्याकाळी चार या वेळेत मतदान होईल. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
मतदान होणाऱ्या मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघात दुरंगी, सात ठिकाणी तिरंगी तर एका मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मतदारांना पक्षादेश (व्हीप) बजावण्यात आला आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर-जालना यांसारख्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने येथे सत्ताधारी महायुतीचे पारडे जड आहे.
निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ मे रोजी निवडणूक जाहीर केली होती. या १७ जागांमध्ये नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ४ जूनला सहा मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ११ जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीची मतमोजणी २२ जूनला होऊन निकाल घोषित केले जातील.
दिल्लीतून मोठी राजकीय घडामोड समोर आली असून ठाकरे गटातील बंडखोर सहा खासदारांनी पक्षाचा व्हीप धुडकावून लावत खासदारांच्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. बैठकीला एकाही बंडखोर खासदाराने हजेरी न लावल्याने ठाकरे गटातील फूट अधिकृतपणे स्पष्ट झाली असून या खासदारांविरोधात कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा रंगली आहे.
18 Jun 2026 06:00 PM (IST)
आज आपण वीकेंडला किंवा ट्रिपला जाताना हायवेवरच्या एखाद्या छानशा ढाब्यावर थांबून जेवण्याचा आनंद घेतो. उघड्या आकाशाखाली बसून, लाकडी खाटांवर (खाटली) आराम करत चमचमीत जेवण जेवणे हा एक वेगळाच अनुभव असतो. पण तुम्हाला माहीत आहे का? आज पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण बनलेले हे ‘ढाबा कल्चर’ खरं तर भारतीय ट्रक ड्रायव्हर्सची गरज म्हणून सुरू झाले होते. हा प्रवास अत्यंत रंजक आणि भारतीय महामार्गांचे अर्थकारण बदलणारा आहे.
18 Jun 2026 05:45 PM (IST)
सोमेश्वरनगर : नीरा बारामती रस्त्यावर पणदरे खिंड नजीक बारामती आगाराच्या बसला आग लागून बस जळून खाक झाली आहे. गुरुवार (दि.१८ ) रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान खामगळ पाटीच्या पुढे मयुरी हॉटेलजवळ ही घटना घडली. नीरा बाजूकडून ही बस बारामतीकडे जात असताना बसच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे चालक धनंजय पवार दिसताच त्यांनी बस बाजूला घेत. आतमध्ये असलेल्या दोन प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले.
18 Jun 2026 05:30 PM (IST)
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना २० जून रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना चेन्नईमध्ये रंगणार आहे. टीम इंडियाने धर्मशाळा येथे पहिल्या एकदिवसीय सामन्यात ७ विकेट्सने धुव्वा उडवला. त्यानंतर, लखनौ येथील दुसऱ्या सामन्यात १७० धावांनी अफगाणिस्तानवर दिमाखात विजय मिळवला. या विजयासाह भारतीय संघाने मालिकाही २- ० ने खिशात घातली. संघाने आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली आहे. शेवटच्या सामन्यात टीम इंडिया संघात कोणते बदल करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
18 Jun 2026 05:23 PM (IST)
भारतात पाळीव प्राण्यांविषयीचा दृष्टिकोन वेगाने बदलत असून, ‘पेट ओनरशिप’पासून ‘पेट पॅरेंटिंग’कडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर इंस्टामार्टच्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईने भारताची ‘कॅट कॅपिटल’ म्हणून अव्वल स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, प्लॅटफॉर्मवरील पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांच्या एकूण मागणीत जवळपास 60 टक्के वाटा मांजरांच्या खाद्यपदार्थांचा असून त्यांनी कुत्र्यांच्या खाद्यपदार्थांनाही मागे टाकले आहे.
18 Jun 2026 05:10 PM (IST)
Kranti Gaud/तेजस भागवत:आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या रणसंग्रामात जेव्हा टीम इंडिया मैदानात उतरते, तेव्हा कोट्यवधी देशवासीयांच्या नजरा टीव्ही स्क्रीनवर खिळलेल्या असतात. आज या स्पर्धेत भारतीय संघ शानदार खेळी करत आहे. अनेक खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहेत. मात्र त्यांच्या आजच्या यशामागे त्यांची अफाट मेहनत आणि कष्ट आहेत. सध्या संपूर्ण देशभरात कौतुकाचा विषय ठरलेली क्रिकेटपटू क्रांती गौडची गोष्ट देखील अत्यंत संघर्षमय आणि भावुक करणारी आहे. आज आपण ‘द मेकिंग ऑफ अ क्रिकेटर‘ या सिरिजमधून क्रांती गौडची कहाणी जाणून घेऊयात.
18 Jun 2026 04:57 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर: शहर व जिल्ह्यात २१ जून रोजी मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत झालेल्या पेपर लीक प्रकरणामुळे यंदा प्रशासनाने सावध पावले उचलले असून, कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरात ४७ तर ग्रामीण भागातील ३ अशा ५० केंद्रांवर ही परीक्षा होईल. यावर्षी प्रथमच कोचिंग क्लासेसने विद्याथ्यांना दिलेल्या जे पेपर्सचीही पडताळणी प्रशासनामार्फत केली जाणार आहे. वाचा सविस्तर...
18 Jun 2026 04:47 PM (IST)
आज आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान महिला संघ आणि साऊथ आफ्रिकेचा संघ आमनेसामने आले अहोते. पाकिस्तानच्या दृष्टीने आजचा सामना हा महत्वाचा समजला जात होता. मात्र या महत्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा या स्पर्धेतील सलग दुसरा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने 2 विकेट्सने विजय प्राप्त केला आहे. वाचा सविस्तर...
18 Jun 2026 04:37 PM (IST)
आजकाल अनेक लोक कामावर जाण्यासाठी, प्रवासासाठी किंवा इतर कामांसाठी ओलासारख्या कॅब सेवांचा वापर करतात. मोबाईल ॲप वापरून काही मिनिटांत कॅब बुक करणे ही एक गरज बनली आहे, परंतु ओलाबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. चंदीगड प्रशासनाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने (STA) कॅब सेवा पुरवणारी कंपनी ओलाचा ॲग्रीगेटर परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित केला आहे. या निर्णयाचा परिणाम कंपनी तसेच तिचे चालक भागीदार आणि प्रवाशांवर झाला आहे. वाचा सविस्तर...
18 Jun 2026 04:27 PM (IST)
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पुन्हा एकदा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि फेरबदल होण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. पुढील आठवडाभरात अनेक महत्त्वाच्या पदांवर बदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलीस दलातील विविध स्तरांवर हालचालींना वेग आला आहे. वाचा सविस्तर...
18 Jun 2026 04:17 PM (IST)
तेलंगणा क्रिकेट असोसिएशनने राज्यातील टीजी२० (TG20) लीगविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. असोसिएशनने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि व्यंकटेश, तसेच भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराज, अंबाती रायडू आणि तिलक वर्मा यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) अनिवार्य परवानगी न घेता ही स्पर्धा आयोजित केली जात असल्याचा आरोप तेलंगणा क्रिकेट असोसिएशने केला आहे. तसेच, लीग अनोंदणीकृत असल्याचा आणि तिचा प्रचार केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. वृत्तानुसार, तेलंगणा क्रिकेट असोसिएशनचा (TCA) म्हटले की, संपूर्ण स्पर्धेला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) आवश्यक परवानगी घेण्यात आलेली नाही. वाचा सविस्तर...
18 Jun 2026 04:05 PM (IST)
Operation Tiger: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. ऑपरेशन टायगरमधील (Operation Tiger) चर्चेत असणारे 6 खासदार गैरहजर राहिल्याने एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. या पक्षफुटीनंतर राज्यभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाने बोलावलेल्या संसदीय दलाच्या बैठकीत या सहा खासदारांनी दांडी मारल्यानंतर ठाकरे गटाचे हे सहा खासदार फुटल्याचा स्पष्ट झालं आहे. हे खासदार फुटल्याने आज त्यांना कायदेशीर नोटीस बजावली जाणार आहे. अश्यातच कायदेतज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकम यांनी याबाबत महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर...
18 Jun 2026 03:55 PM (IST)
तामिळनाडूतील मदुराई येथे पोलिसांकडून केलेल्या कथित छळानंतर २६ वर्षीय दलित तरुणाचा पोलिस कोठडीतच मृत्यू झाला. १०१ दिवस मृतदेह शवागृहात ठेवल्यानंतर बुधवारी त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. मद्रास उच्च न्यायालयाच्या कठोर निर्देशांनंतर, मदुराई येथील विद्युत स्मशानभूमीत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या संपूर्ण घटनेमुळे आता पोलिस जबाबदारी आणि मानवाधिकार उल्लंघनाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. वाचा सविस्तर
18 Jun 2026 03:50 PM (IST)
PM Modi MANAV mantra G7 summit 2026 : फ्रान्समधील निसर्गरम्य एव्हियान (Evian) शहरात आयोजित करण्यात आलेल्या २०२६ च्या जी७ (G7) शिखर परिषदेमध्ये भारताने पुन्हा एकदा जागतिक पटलावर आपली मजबूत राजनैतिक पकड सिद्ध केली आहे. या उच्चस्तरीय परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी जागतिक नेत्यांसमोर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या भविष्यकालीन वापराबाबत भारताचा अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी दृष्टिकोन सादर केला. एआयच्या वाढत्या प्रभावाच्या युगात मानवाचे अस्तित्व आणि त्याचा विकास कसा अबाधित राखता येईल, याबाबत त्यांनी दिलेला ‘MANAV’ (मानवकेंद्रित) मंत्र सध्या जगभरातील टेक आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा मुख्य विषय बनला आहे. वाचा सविस्तर
18 Jun 2026 03:45 PM (IST)
Shivsena Opration Tiger News Marathi : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. ऑपरेशन टायगरमधील (Opration Tiger) चर्चेत असणारे 6 खासदार गैरहजर राहिल्याने एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून अनुपस्थित राहिलेल्या 6 खासदारांवर कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे.मात्र या 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंनी साथ का सोडली? याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. वाचा काय आहे कारण?
18 Jun 2026 03:40 PM (IST)
ICC Women’s T 20 World Cup 2026: सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी महिला टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा सुरू आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी असे दोन भाग करण्यात आले आहेत. १३ जूनपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भारतीय संघ आतापर्यंत दोन सामने खेळला आहे. दोन्ही सामने जिंकून भारतीय संघ आघाडीवर आहे. तर पाकिस्तानच्या संघाची साफ वाट लागल्याचे दिसून येत आहे. वाचा सविस्तर
18 Jun 2026 03:35 PM (IST)
भारतीय रस्त्यांवर इलेक्ट्रिक गाड्यांचा बोलबाला वाढत असतानाच, फ्रेंच कार कंपनी सिट्रॉनने आपली नवी कोरी Citroen e-C3X इलेक्ट्रिक SUV भारतीय बाजारात उतरवली आहे. आकर्षक डिझाईन आणि खिशाला परवडणाऱ्या किमतीत आलेली ही स्टायलिश कार सध्या ऑटोमोबाईल विश्वात धुमाकूळ घालत आहे. वाचा सविस्तर
18 Jun 2026 03:30 PM (IST)
ठाणे: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. तब्बल १ कोटी ९० लाख रुपयांहून अधिक किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे गावाजवळ कंटेनरमधून गोवा राज्यातून अवैधरित्या आणण्यात येणाऱ्या मद्याची वाहतूक उघडकीस आली असून या कारवाईमुळे मद्य तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर
18 Jun 2026 03:25 PM (IST)
भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यातील नुकत्याच झालेल्या सामन्यादरम्यान युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि एका श्रीलंकन खेळाडूमध्ये मैदानावर झालेला वाद झाला. हा वाद सतत चर्चेचा विषय बनला आहेत्तानुसार, या घटनेनंतर सामनाधिकारी प्रदीप जयप्रकाश यांनी दोन्ही खेळाडूंना ५० टक्के दंड ठोठावण्याची शिफारस केली आहे, जो त्यांच्या सामना शुल्कातून कापला जाईल. दरम्यान, भारत ‘अ’ संघाचा कर्णधार तिलक वर्मा याला एकूण ३० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. बीसीसीआयही वैभव सूर्यवशीवर कारवाई करेल अशीही चर्चा आहे. मात्र, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवजित सैकिया यांनी परिस्थिती स्पष्ट केली आहे. वाचा सविस्तर
18 Jun 2026 03:20 PM (IST)
आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. आयकर विभागाने मूल्यांकन वर्ष (AY) २०२६-२७ साठी करदात्यांच्या विविध श्रेणींसाठी अंतिम मुदत निश्चित केली आहे. विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतावर आणि तुमच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक आहे की नाही यावर अवलंबून असते. वाचा सविस्तर
18 Jun 2026 03:15 PM (IST)
काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील एका उभरत्या सीताऱ्याने अंत पाहिला. अभिनेत्री संचिता उगले आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळली. या अभिनेत्रीने त्याच दिवशी आत्महत्या केली, ज्या दिवशी काही वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने स्वतःचे जीवन संपवले होते, त्यामुळे संपूर्ण देशभरात या चर्चेविषयी वेगवेगळे निष्कर्ष दिसून आले. अशामध्ये मनोरंजन विश्वातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. हॉरर चित्रपट The Ring मधील ‘समारा मॉर्गन’ या भूमिकेमुळे जगभर प्रसिद्ध झालेली अभिनेत्री डेव्ही चेस हिचं वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी निधन झालं आहे. तिच्या निधनामुळे चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतही हळहळ व्यक्त केली जात आहे. वाचा सविस्तर
18 Jun 2026 03:10 PM (IST)
Operation Tiger : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये दुसऱ्यांदा पक्षपुटी झाली असून शिवसेना शिंदेगटाच्या ‘ऑपरेशन टायगर‘ च्या अंतर्गत ठाकरे गटातील 6 खासदार फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. या पक्षफुटीनंतर राज्यभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाने बोलावलेल्या संसदीय दलाच्या बैठकीत या सहा खासदारांनी दांडी मारल्यानंतर ठाकरे गटाचे हे सहा खासदार फुटल्याचा स्पष्ट झालं आहे. हे खासदार फुटल्याने आज त्यांना कायदेशीर नोटीस बजावली जाणार आहे. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. “आपण मोठा तिर मारला आहे असे जर त्यांना वाटतं असेल तर तोच तिर त्यांच्या ***” अश्या शेलक्या शब्दांत त्यांनी खासदारांवर टीका केली आहे. वाचा सविस्तर
18 Jun 2026 03:05 PM (IST)
सातारा: ठाकरे गटातील अंतर्गत नाराजी आणि गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. खासदार आणि आमदारांनंतर आता ठाकरे गटातील नगरसेवकांमध्येही प्रचंड अस्वस्थता असून, आगामी काळात पक्षात मोठी फूट पडणार असल्याचा खळबळजनक दावा युवासेना नेते अमेय घोले यांनी केला आहे. विशेष म्हणजे, सातारा जिल्ह्यातील ठाकरे गटाचे २० ते २५ नगरसेवक सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते लवकरच मोठा निर्णय घेतील, असे सांगत घोलेंनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. वाचा सविस्तर
18 Jun 2026 03:00 PM (IST)
सोलापूर, शहर प्रतिनिधी: सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी गुरुवारी जिल्ह्यातील सहा मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुमारे ५० टक्के मतदानाची नोंद झाली. दरम्यान, एका गुन्ह्यात अटकेत असलेल्या भाजपच्या नगरसेविका शालन शिंदे यांनी पोलीस बंदोबस्तात जेलमधून येत मतदानाचा हक्क बजावल्याने या निवडणुकीची विशेष चर्चा रंगली.
बार्शी, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर येथील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची गर्दी दिसून आली. सर्व केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी शहरातील मतदान केंद्रांना भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी कमांडो पथकही सज्ज ठेवण्यात आले होते. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी जिल्हा नियोजन समितीत उभारलेल्या नियंत्रण कक्षातून सर्व मतदान केंद्रांचे थेट चित्रिकरण पाहत निवडणूक प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले. तसेच आवश्यक सूचना मतदान केंद्राध्यक्षांना दिल्या.
18 Jun 2026 02:50 PM (IST)
India Bangladesh relations Tarique Rahman : शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर शेजारील देश बांगलादेशातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. १७ फेब्रुवारी रोजी सत्तेवर आलेले बांगलादेशचे नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान (Tariq Rahman) हे पुढील आठवड्यात आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यावर म्हणजेच मलेशिया आणि चीनला जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या सर्व चर्चांवर पडदा टाकत बांगलादेश सरकारच्या एका उच्चपदस्थ सूत्राने स्पष्ट केले आहे की, पंतप्रधान तारिक रहमान यांच्या या परदेश दौऱ्याच्या योजनांचा भारतासोबतच्या द्विपक्षीय आणि ऐतिहासिक संबंधांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.
18 Jun 2026 02:45 PM (IST)
सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवर ८.२५% व्याजदराला मंजुरी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्याजाची रक्कम या महिन्यातच सदस्यांच्या खात्यात जमा केली जाऊ शकते. याचा फायदा ७ कोटींहून अधिक EPFO सदस्यांना होईल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी EPF ठेवींवर ८.२५% व्याजदराला मंजुरी दिली आहे. EPFO चे केंद्रीय विश्वस्त मंडळ EPF वरील व्याजदराची शिफारस करते, ज्यामध्ये सरकार, कंपन्या आणि कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी असतात. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) कडून मंजुरी मिळाल्यानंतर, PF वरील व्याजदर अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जातो. अर्थ मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर, कामगार आणि रोजगार मंत्रालय त्याची अधिकृत सूचना जारी करते आणि त्यानंतर व्याजाची रक्कम सदस्यांच्या खात्यात जमा केली जाते.
18 Jun 2026 02:40 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): ‘भारत सरकारने १७ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार, जर तुमचे मीटर ‘स्मार्ट मीटर’ नसेल, तर हा संदेश मिळाल्यापासून ४८ तासांनंतर महावितरण किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींद्वारे तुमचे सध्याचे मीटर बदलून त्याऐवजी ‘स्मार्ट मीटर’ बसविण्यात येणार आहे’ असे मेसेज शनिवारी वीज ग्राहकांच्या मोबाईलवर धडकले. यानंतर लगेचच स्मार्ट वीजमीटर बसवण्याची प्रक्रिया सुरूही झाली. दोनच दिवसात शहरातील १ लाख ४१ हजार ४८३ स्मार्ट वीजमीटर बसविण्यात आले असल्याचे महावितरणने म्हटले आहे. शनिवारी मेसेज धडकल्यापासून वीजग्राहकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे तर ‘भाकप’कडून वीज मीटर बसवण्यास विरोध कायम आहे. दरम्यान, राज्यात महावितरणतर्फे आतापर्यंत १ कोटी २० लाख स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. स्मार्ट मीटरमुळे अचूक रीडिंग होते. राज्यात स्मार्ट मीटरचे प्रमाण वाढल्यानंतर ग्राहकांच्या वीजबिलाच्या तक्रारी खूप कमी झाल्या आहेत.
18 Jun 2026 02:30 PM (IST)
US-Iran Peace Deal News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका-इराणमधील दीर्घकाळापासून सुरु असलेला संघर्ष आता संपुष्टात येणार आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी शांतता कराराच्या MoU वर स्वाक्षरी केली आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय राजकाराणात मोठा चर्चा सुरु झाली आहे. ट्रम्प यांनी इराणसोबत डील पूर्ण झाल्याचे जाहीर केले आणि आनंद व्यक्त करत सर्वांचे अभिनंदनही केले. परंतु हा करार नेमका अणु करार आहे, शांतता करार आहे की केवळ सामंजस्य करार आहे याबाबत पेच निर्माण झाला आहे.
18 Jun 2026 02:20 PM (IST)
सोशल मिडियावर राजस्थानच्या उदयपूरमध्ये घडलेल्या एका अपघाताचे दृष्य शेअर करण्यात आले आहेत. एका एक्टिव्हीटी दरम्यान मोठी दुर्घटना झाली आणि पर्यटक मृत्यूच्या दारात जाऊन अडकले. हवामानातील अचानक बदल आणि मुसळधार पावसामुळे, काही पर्यटक ७० मीटर उंच झिप लाइनवर अडकून राहिले. मुख्य म्हणजे बचावासाठीचा हा थरार ८ मिनिटे सुरु राहिला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून यातील दृष्यांनी सर्वांच्याच अंगावर काटा आणला आहे.
वाचा सविस्तर : Udaipur Incident : ७० मीटर उंचावर झिप लाईनवर अडकले पर्यटक, ८ मिनिटे हवेत अडकून प्राण कंठाशी; Video Viral
18 Jun 2026 02:15 PM (IST)
नाशिक: नाशिक येथून एक धक्कादायक घटना समोर अली आहे. तपोवन परिसरातील केवडीबन येथे एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. ही हत्या प्रेमसंबंधातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून तपास सुरु आहे.
केवडीबन येथील कन्नमवार पुलाच्या खाली मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास सफाई कर्मचारी काम करत होते. तेव्हा एका काळ्या रंगाच्या सुटकेसमधून त्यांना उग्र वास आला. हा वास अतिशय तीव्र असल्याने त्यांना संशय बळावला. (Nashik Crime) तातडीने त्यांनी पोलिसांना या बाबतची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना सुटकेसमध्ये एका गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह आढळून आला. सुटकेस मध्ये मृतदेह असल्याचे समाजताच तातडीने फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने तपास केला तेव्हा महिलेच्या मृतदेहावर एक ‘टॅटू’ आढळला. (Nashik Crime)
18 Jun 2026 02:10 PM (IST)
आयपीएल २०२६ चा हंगाम संपून अजून एक महिनाही झाला नाही. आता, आयपीएल २०२७ बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. वृत्तानुसार, बीसीसीआयने आयपीएल २०२७ साठी आपल्या योजना जाहीर केल्या आहेत. आयपीएलचा २० वा हंगाम या वर्षीच्या तुलनेत थोडा लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२७ १० मार्च रोजी सुरू होणार असल्याची चर्चा आहे. यामागे हवामान हे कारण असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. बीसीसीआयच्या मते, यामुळे खेळाडूंना तीव्र उष्णता आणि कडक उन्हापासून दिलासा मिळेल. भारतीय क्रिकेट बोर्डाने असेही म्हटले आहे की, आयपीएल २०२७ मध्ये सामन्यांची संख्या वाढवण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही.
18 Jun 2026 02:00 PM (IST)
गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ संपूर्ण जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवणाऱ्या अमेरिका आणि इराणमधील युद्धाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दोन्ही देशांमधील वाढता लष्करी संघर्ष आणि तणाव संपवण्यासाठी एक ऐतिहासिक शांतता करार (Peace Treaty) करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी एका महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर (MoU) औपचारिकपणे स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हा करार दोन वेगवेगळ्या भाषांमध्ये तयार करण्यात आला असून दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील अटी आणि नियम तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. या कराराच्या घोषणेनंतर जगभरातील शेअर बाजार आणि तेल बाजाराने सुटकेचा श्वास सोडला आहे.
18 Jun 2026 01:55 PM (IST)
मुंबई महानगरपालिकेतील राजकीय वातावरण ‘ऑपरेशन टायगर‘च्या निमित्ताने कमालीचे तापले असून, सत्ताधारी भाजप आणि विरोधी ठाकरे गटात थेट ‘आकड्यांचे युद्ध’ आणि कलगीतुरा रंगू लागला आहे. ठाकरे गटातील काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चेने पालिकेच्या गोटात मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यातच शिंदे गटाचे किरण लांडे यांनीही मुंबईतील ३० ते ३५ नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा करून पालिकेत ‘ऑपरेशन टायगर २.०’च्या चर्चाना हवा दिली.
18 Jun 2026 01:45 PM (IST)
पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर चांगलेच आक्रमक झाले होते. बालवडकर यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नावरून सभागृहात चांगलीच खडाजंगी झाली. अजित पवार यांच्या तैलचित्राचा मुद्दा अमोल बालवडकर यांनी उपस्थित केला. यावेळी महापौर आणि बालवडकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. अमोल बालवडकर यांनी विचारले, “अजितदादा पवार यांचे तैलचित्र पालिकेत कुठेच दिसत नाही. पुणे महापालिका वास्तूत ते का लावले गेले नाही? हे तैलचित्र सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन महापौरांना भेट म्हणून दिले होते.” त्यांनी यावर तातडीने खुलासा करण्याची मागणी अमोल बालवडकर यांनी केली.
18 Jun 2026 01:40 PM (IST)
भारत ‘अ’ आणि अफगाणिस्तान ‘अ’ यांच्यातील त्रिकोणीय मालिकेतील पाचवा सामना भारत ‘अ’ संघाने १०१ धावांनी जिंकला. हा सामना दांबुला येथे खेळला गेला, जिथे अफगाणिस्तान ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, भारताने ५० षटकांत ९ विकेट्स गमावून ३१९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, अफगाणिस्तान संघ ३६.५ षटकांत २१८ धावांवर सर्वबाद झाला. भारताने अफगाणिस्तावर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह, भारतीय संघ श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. दरम्यान, या स्पर्धेचा अंतिम सामना कधी खेळला जाईल, जाणून घ्या.
18 Jun 2026 01:35 PM (IST)
खाडी देशांमध्ये (Gulf Countries) नोकरी करून आपले भविष्य उज्ज्वल करू पाहणाऱ्या लाखो भारतीय तरुणांसाठी आणि कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सौदी अरेबिया सरकारने परदेशी कामगारांच्या भरती प्रक्रियेला अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी आणि आपल्या देशातील कामगार बाजारपेठेवर नियंत्रण मिळवण्यासाठी वर्क व्हिसाच्या (Saudi Work Visa) नियमांमध्ये अत्यंत मोठे आणि महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. सौदी अरेबियाच्या मानव संसाधन आणि सामाजिक विकास मंत्रालयाच्या अधिकृत ‘किवा’ (Qiwa) प्लॅटफॉर्मने या नवीन नियमांची घोषणा केली आहे. या नवीन बदलांनुसार, सौदीमध्ये नव्याने सुरू झालेल्या कंपन्या किंवा स्टार्टअप्ससाठी तात्काळ उपलब्ध असणाऱ्या वर्क व्हिसाच्या संख्येत मोठी कपात करण्यात आली आहे.
18 Jun 2026 01:25 PM (IST)
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ने बुधवारी तामिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री आणि त्यांचे माजी सहकलाकार, थलपथी विजय यांची भेट घेतली. विजय यांनी पदभार स्वीकारल्यापासून सामंथा यांची त्यांच्यासोबतची ही पहिलीच भेट होती आणि त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. सामंथाने या खास प्रसंगाचे काही सुंदर फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
18 Jun 2026 01:15 PM (IST)
नवी मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत असून विमानतळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIA) १५ जुलैपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि मालवाहतूक सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. ही सेवा सुरू होणे अंतिम नियामक मंजुरी आणि सीमाशुल्क औपचारिकता पूर्ण होण्यावर अवलंबून आहे.आंतरराष्ट्रीय उड्डाणे आखाती प्रदेशावर लक्ष केंद्रित करून सुरू होणार असून एनएमआयएचे अध्यक्ष कॅप्टन बीव्हीजेके शर्मा यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा आणि मालवाहतूक सेवा एकाच दिवशी सुरू होण्याची शक्यता आहे. सुरुवातीचे मार्ग कमी अंतराच्या ठिकाणांवर, विशेषतः आखाती प्रदेशावर लक्ष केंद्रित करतील अशी अपेक्षा आहे. सुरुवातीच्या आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करणाऱ्या विमान कंपन्यांमध्ये एअर इंडिया एक्सप्रेस आणि इंडिगो यांचा समावेश अपेक्षित आहे, ज्यामुळे विमानतळ जागतिक स्तरावर जोडले जाईल.
18 Jun 2026 01:06 PM (IST)
बिहार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय तरुणाने ११ एक्सपायरी गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कुटुंबीयांनी त्याला बुधवारी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हादरून गेला आहे. घडलेली घटना भगलपूरमध्ये घडली.
18 Jun 2026 12:50 PM (IST)
भारत आणि फ्रान्स यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, उच्च शिक्षण, आरोग्य, अंतराळ संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रातील सहकार्याला नवी दिशा देण्यासाठी ‘इंडिया-फ्रान्स इनोव्हेशन रोडमॅप २०३०’ जाहीर केला आहे. या रोडमॅप अंतर्गत ‘ट्रस्टेड एआय’ (विश्वसनीय कृत्रिम बुद्धिमत्ता) हा द्विपक्षीय सहकार्याचा प्रमुख आधारस्तंभअसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फेब्रुवारी २०२६ मध्ये भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा दिल्यानंतर हा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात आला आहे.
18 Jun 2026 12:45 PM (IST)
तीन महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षानंतर अमेरिका आणि इराण यांच्यात एक करार झाला आहे. दोन्ही देशांमधील शांतता कराराच्या बातमीनंतर, सोने आणि चांदीच्या किमती सलग तीन दिवस वाढल्या. तथापि, आज, दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये पुन्हा घसरण होत आहे. कराराच्या बातमीनंतर शेअर बाजारात तेजी आली आणि बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी तो वाढीसह बंद झाला. गुरुवारी सकाळी COMEX वर सोन्याची किंमत प्रति औंस ३५ डॉलरहून अधिक घसरून ४,३४५ डॉलर प्रति औंसवर स्थिरावली. त्याचप्रमाणे, चांदीची किंमत जवळपास एक डॉलरने घसरून ७० डॉलर प्रति औंस झाली.
18 Jun 2026 12:25 PM (IST)
खेड तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रजवेल मोहल्ला येथे गुरुवारी पहाटे घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत २५ मुक्या जनावरांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अवघ्या काही मिनिटांत आगीने रौद्र रूप धारण केल्याने गोठ्यातील जनावरांना बाहेर काढण्यास वेळ मिळाला नाही. या दुर्घटनेत १७ म्हशी, १ गाय आणि ७ वासरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पशुपालक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
18 Jun 2026 12:20 PM (IST)
रत्नागिरी जिल्ह्याच्या विस्तीर्ण सागरी किनारपट्टीचा विकास करण्यासाठी आणि स्थानिक मच्छीमार बांधवांसह पर्यटनाला मोठी चालना देण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये जेटी निर्माण करणे, जोडरस्ते बांधणे आणि समुद्राच्या उधाणापासून गावांचे रक्षण करण्यासाठी संरक्षक बंधारे उभारणे अशा एकूण ६ मोठ्या प्रकल्पांच्या अंदाजपत्रकांना आणि आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
18 Jun 2026 12:15 PM (IST)
इटलीतील जी-७ शिखर परिषदेत भारताची ताकद दाखवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आता एका नव्या महत्त्वाच्या राजनैतिक मोहिमेसाठी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदींचे विमान पॅरिस विमानतळावर उतरताच संपूर्ण परिसर ‘मोदी-मोदी’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी दुमदुमून गेला. तेथे उपस्थित असलेल्या शेकडो अनिवासी भारतीयांनी (Indian Diaspora) पारंपारिक वेशभूषेत, ढोल-ताशांच्या गजरात आणि तिरंगा फडकवत पंतप्रधानांचे जंगी स्वागत केले. आपल्या स्वागतासाठी जमलेल्या देशबांधवांचा प्रचंड उत्साह पाहून पंतप्रधान मोदींनी गाडीतून उतरून सर्वांना हात उंचावून अभिवादन केले आणि त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधत आपला तीव्र आनंद व्यक्त केला. भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय आणि तांत्रिक संबंधांना एका नव्या उंचीवर नेणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.
18 Jun 2026 12:10 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेला ऑपरेशन टायगरमुळे मोठा फटका बसला आहे. असे असताना आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी शिवसेना शिंदे गटाच्या कथित ‘ऑपरेशन टायगर’वर जोरदार टीका करत हे ‘ऑपरेशन टायगर’ नसून ‘ऑपरेशन गिधाड’ असल्याचा आरोप केला. सत्तेसाठी सुरू असलेली ही राजकीय तोडफोड लोकशाहीसाठी घातक असल्याचे सांगत त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला.
18 Jun 2026 12:05 PM (IST)
अहिल्यानगर येथून एक थरारक हत्याकांड समोर आलं आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमधे राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीची हत्या तिच्याच प्रियाराराने केल्याचे समोर आले आहे. आपल्या प्रेयसीची हत्या केल्यांनतर आरोपीने दोन दिवस मृतदेह घरातच ठेवला होता. यानंतर वडिलांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. मात्र एक फोन कॉल आणि या थरारक हत्याकांडाचा उलगडा झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे घडली.
18 Jun 2026 12:00 PM (IST)
जगात प्रथमच, पाण्यावर चालणारे शहर! फ्रिडम शिप हा एक असा बिग बजेट प्रकल्प आहे ज्यात ८०,००० हजार लोकांना राहण्यासाठी विशाल जहाजाची निर्मिती केली जाईल. शहराप्रमाणेच यात बँकेपासून शाळांपर्यंत अनेक सुविधा देखील पुरवल्या जातील. याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यातून आपण जहाजाची झलक पाहू शकता.
18 Jun 2026 11:54 AM (IST)
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज (18 जून 2026 ) आपल्या खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. याचदरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात संभाव्य फूट पडण्याच्या चर्चांदरम्यान गुरुवारी बोलावण्यात आलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पक्षाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, सकाळी ११ वाजता होणाऱ्या या बैठकीची माहिती सर्व खासदारांना देण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत केवळ तीन लोकसभा खासदारच बैठकीला उपस्थित राहिले असून त्यांच्यातच बैठक सुरू आहे.या घडामोडींमुळे पक्षांतर्गत फूट पडण्याच्या शक्यतांना आणखी बळ मिळाले आहे.
18 Jun 2026 11:50 AM (IST)
श्रीगोंद्यात चारित्र्याच्या संशयातून 24 वर्षीय प्रियकराने 17 वर्षीय अल्पवयीन प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने मृतदेह दोन दिवस घरात लपवून ठेवला आणि नंतर वडिलांच्या मदतीने जंगलात नेऊन पेट्रोल टाकून जाळला. पोलिसांनी बाप-लेकाला अटक केली आहे.
18 Jun 2026 11:40 AM (IST)
चार महिन्यांपासून सुरु असलेला मध्यपूर्वेतील अमेरिका इराण संघर्ष (US-Iran Conflict) संपवण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता कराराच्या MoU वर स्वाक्षरी केली आहे. तसेच इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी देखील डिजिटल स्वाक्षरी केली अशल्याचे माहिती इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी दिली.
18 Jun 2026 11:30 AM (IST)
तीन महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षानंतर अमेरिका आणि इराण यांच्यात एक करार झाला आहे. दोन्ही देशांमधील शांतता कराराच्या बातमीनंतर, सोने आणि चांदीच्या किमती सलग तीन दिवस वाढल्या. तथापि, आज, दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये पुन्हा घसरण होत आहे. कराराच्या बातमीनंतर शेअर बाजारात तेजी आली आणि बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी तो वाढीसह बंद झाला. गुरुवारी सकाळी COMEX वर सोन्याची किंमत प्रति औंस ३५ डॉलरहून अधिक घसरून ४,३४५ डॉलर प्रति औंसवर स्थिरावली. त्याचप्रमाणे, चांदीची किंमत जवळपास एक डॉलरने घसरून ७० डॉलर प्रति औंस झाली.






