मुंबई – चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. येथे दररोज हजाराहून अधिक रग्ण समोर येत आहेत. त्यामुळे चीनच्या अनेक प्रांतांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, बिझनेस टायकून हर्ष गोएंका यांनी चीनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तुरुंगातील काही खोल्या दिसत आहेत.
व्हिडीओसोबत त्याने लिहिले की, जर तुम्ही विचार करत असाल की हे जेल आहे. तर तुम्ही चुकीचे आहात. हे जेल नसून चीनचे कोविड आयसोलेशन सेंटर आहे. मात्र हा व्हिडिओ चीनच्या कोणत्या प्रांतातील आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या आयसोलेशन सेंटरमध्ये अनेक गर्भवती महिला आणि कोरोनाबाधित मुले बंद आहेत. त्याचवेळी, कोरोना बाधित लोकांना अशा आयसोलेशनमध्ये पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोक प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की काहीतरी गोंधळ वाटत आहे. एवढी तयारी आणि कडकपणा करूनही चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ते आता काय लपवत आहेत ते मला समजत नाही. दुसर्या यूजरने लिहिले की, मला वाटते की चीनमध्ये आणखी धोकादायक आजार आला आहे.






