
वॉशिंग्टन : चीनविरोधात वार्तांकन केले जाऊ नये यासाठी चीन जगभरात मोठी मोहीम चालवत असून, चीन पाकिस्तानी माध्यमांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा अमेरिकेच्या वतीने करण्यात आला आहे.
स्वप्रतिमा उजळविण्यासाठी चीनचे प्रयत्न
त्याचप्रमाणे चीन हा रशियाच्या मदतीने जगभरातील माध्यमांमध्ये स्वप्रतिमा उजळविण्यासाठी काम करीत असल्याचेही अमेरिकेच्या अहवालात म्हटले आहे.
चीन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या देशांच्या यादीमध्ये पाकिस्तान अग्रस्थानी असून, चीन-पाकिस्तान मीडिया कॉरिडोरच्या माध्यमातून चीन येथील माध्यमांवर नियंत्रण ठेवत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
चीनचे रशियासोबत माहिती क्षेत्रात काम
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालात चीन रशियासोबत माहिती क्षेत्रात काम करीत असल्याचे म्हटले आहे. याव्यतिरिक्त, चीन स्वतःच्या विरुद्ध नकारात्मक कथनाचा प्रतिकार करण्यासाठी इतर जवळच्या भागीदारांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या मोहिमेत चीनचा प्रमुख मित्र पाकिस्तानवर डोळा असल्याचे अहवालात म्हटले आहे.
पाकिस्तानी मीडियावर लक्षणीय नियंत्रण
चीनने चीन-पाकिस्तान मीडिया कॉरिडॉरचा एक भाग म्हणून पाकिस्तानी मीडियावर लक्षणीय नियंत्रण मिळविण्यासाठी चर्चेची मागणी केली आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने आपल्या अहवालात आरोप केला आहे की, चीन परदेशी माहिती हाताळण्याच्या प्रयत्नांवर दरवर्षी अब्जावधी डॉलर्स खर्च करतो.