बाप रे! भररस्त्यात भिडले दोन अवाढव्य गेंडे; स्थानिक अन् पर्यटकांची उडाली तारांबळ, थरारक उडवणारा Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हे देखील वाचा : दबक्या पावलांनी आली अन्…! पर्यटकांच्या डोळ्यांदेखत सिंहीणीने केली शिकार; जंगलातील ‘तो’ थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद, Video Viral
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातील एक गेंडा जंगलातून बाहेर वस्तीच्या दिशेने आला होता. यानंतर काही वेळातच दुसरा एका गेंडानेही वस्तीत एन्ट्री घेतली. हे दोन्ही गेंडे एकमेकांसमोर येताच अचानक आक्रमक झाले. दोघांनी एकमेकांना रस्त्यातच धडक देण्यास सुरुवात केली. दोन्ही गेंड्यांची ताकद आणि वेग एवढा भयानक होता की स्थानिक आणि पर्यटकांचा गोंधळ उडाला होता. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, दोन्ही गेंडे एकमेकांवर शिंगांनी वार करताना दिसत आहे. या भीतीपोटी लोकांनी आपली दुकानेही बंद केली होती. काही वेळानी लढाई थांबली असून दोन्ही गेंड रस्त्याच्या कडेला शांतपणे फुले खाताना दिसली.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @sachintha108 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. लोकांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. जंगलाच्या सीमेवर लोकांची वाढती वस्ती, पर्यटन आणि नैसर्गिक अधिकासाची नासधूसमुळे जंगली प्राणी मानवी वस्तीत शिरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली आहे.
हे देखील वाचा : स्टाईलच्या नादात झाला ‘लोचा’! रिल बनवताना महिलेचा पायऱ्यांवरुन तोल गेला अन्…, पाहा पुढं काय घडलं? Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






