उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. 144 वर्षांनी आलेल्या या महाकुंभासाठी कोट्यवधी भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. मात्र मौनी अमावस्येच्या निमित्ताने ही गर्दी वाढली होती. मौनी अमावस्येमुळे अमृत स्नानाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र महाकुंभमेळ्यामध्ये दुर्घटना झाली आहे. महाकुंभातील संगमवर असलेलं एक बॅरिअर तुटल्याने चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 15 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू झाला तर 50 पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याची माहिती दिली जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक भाविक सहभागी असल्याचे समोर येत आहे. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.
महाकुंभमधील दुर्घटनेवर महराष्ट्रातील नेत्यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत प्रयागराजमध्ये घडलेली घटना वेदनादायी आहे, या घटनेत ज्या भाविकांचा मृत्यू झाला आहे, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
काय आहे मुख्यमंत्री फडणवीस यांचे ट्वीट?
प्रयागराज महाकुंभ में हादसे की खबर बेहद दुखद है। इस घटना में जिन श्रद्धालुओं की मृत्यु हुई, मैं उन्हें भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। जिन्होंने अपने परिजनों को खोया है, उनके साथ हमारी संवेदनाएँ हैं।
जो घायल हुए उन्हें जल्द स्वास्थ प्राप्त हो, ऐसी ईश्वर से प्रार्थना करता…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 29, 2025
“ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे. त्यांच्याप्रती आमच्या संवेदना आहेत. जखमी झालेले भाविक लवकरात लवकर बारे व्हावेत अशी देवाकडे प्रार्थना आहे.”
दरम्यान महाकुंभमध्ये घडलेल्या दुर्घटनेत अनेक भाविकांनी आपलिया जीव गमावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.
#WATCH | Maha Kumbh Stampede | Mumbai: Maharashtra BJP President Chandrashekhar Bawankule says, "The incident was extremely unfortunate and the whole nation is worried. PM Narendra Modi has taken cognisance of the situation. Such an incident should not have happened but there are… pic.twitter.com/BbjlmEtpDX
— ANI (@ANI) January 29, 2025
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यामुळे संपूर्ण देश चिंतेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेची दखल घेतली आहे. ”
मोदी आणि योगी यांच्यात चर्चा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली आहे. तासभरामध्ये दोन वेळा पंतप्रधान मोदी यांनी फोनवर योगी आदित्यनाथ यांच्यासोबत चर्चा केली. तसेच त्यांच्याकडून क्षणाक्षणाचे अपडेट जाणून घेतले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्री योगी यांच्याशी चर्चा केली आहे. या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यांनी तातडीने मदत देण्यावर भर दिला. भाजप अध्यक्ष आणि आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलून सर्व प्रकारची वैद्यकीय मदत देऊ केली. या संपूर्ण घटनेवर प्रशासनाकडून मिनिटा-मिनटाला लक्ष दिलं जात असून सर्व मदत करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
नेमकं काय झालं?
महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येचे मुख्य स्नान असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास संगम किनाऱ्यावर गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेंगराचेंगरी झाली. भाविक इकडेतिकडे पळू लागले. यादरम्यान अनेकजण खाली पडून जखमी झाले. संगम किनाऱ्यावर गर्दी वाढल्याने पोलीस लोकांना घाटावरुन बाजूला करत होते. त्यावेळी लोक जोरदार पळू लागले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. या घटनेनंतर तात्काळ जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मेळा पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व आखाड्यांशी चर्चा सुरू आहे. अमृतस्नानाची वेळ काही काळानंतर निश्चित होऊ शकते. सर्व बॅरल ब्रिज आणि बॅरिकेड्स उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संगम नाक्यावर गर्दी जमू नये, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.