नवी दिल्ली – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गुरूवारी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहेत. त्यांचे लग्न चंदिगड स्थित सीएम हाऊसमध्ये होईल. डॉक्टर गुरप्रीत कौर असे त्यांच्या वधूचे नाव आहे.
भगवंत मान यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांचा २०१५ मध्ये घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्यांची पत्नी अमेरिकेला गेली होती. पहिल्या पत्नीपासून त्यांना २ मुले आहेत. तेही आपल्या आईसमवेत अमेरिकेत राहतात. ते मान यांच्या शपथविधीसाठी मायदेशी आले होते.
भगवंत मान यांची पहिली पत्नी त्यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे नाराज होत्या. मान यांनी प्रथम पंजाब पीपल्स पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढली. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते आम आदमी पार्टीत सहभागी झाले. २०१४ मध्ये ते संगरूर लोकसभा मतदार संघातून मैदानात उतरले. त्यानंतर पती-पत्नीत वाद निर्माण झाला. याची परिणिती २०१५ मधील त्यांच्या घटस्फोटात झाली.