जम्मू काश्मीरमध्ये मजूर व्क्तीवर दहशदवादी हल्ला झाल्याने खळबळ (फोटो - सोशल मीडिया)
जम्मू : जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन होऊन अगदी दोन दिवस झाले आहेत. यामध्येच आता जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाई होण्यास सुरुवात झाली आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये परप्रांतीय मजुरांची हत्या करण्यात आली. बिहारमधील एका मजुराची दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये गोळ्या झाडून हत्या केली. या कामगाराचा मृतदेह झुडपातून बाहेर काढण्यात आला आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने लोक गवंडी, सुतार आणि भात कापण्याचे काम करण्यासाठी कामगार येत असतात. आता या कामगारांची हत्या दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. काश्मीरमधील या घटनेमुळे देशभरामध्ये खळबळ झाली आहे. एका अनोळखी नंबरवरुन कामगाराला बोलावण्यात आले. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. अशोक चौहान असे या कामगाराचे नाव आहे. तो अनंतनागच्या संगम भागात राहत होता. अशोक चौहान यांच्या मित्राने सांगितले की, दोघेही सकाळी 7 वाजता भाड्याच्या खोलीतून बाहेर पडले आणि सुमारे एक तास एकत्र राहिले. त्यानंतर अशोकचा फोन आला त्यानंतर त्याने आपल्या साथीदाराला आपण कुठेतरी जात असल्याचे सांगितले. कापणी केलेली मक्याची शेतं पाहण्यासाठी तो बाहेर गेला होता आणि त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. त्याचवेळी त्याचा शोध सुरू झाला, मात्र कोणताही सुगावा लागला नाही. त्यानंतर झाडांमध्ये त्याचा मृतदेह आढळला.
पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अशोकची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्याला दहशतवादी कृत्य म्हणता येईल, परंतु त्याला अज्ञात व्यक्तीने फोनवर कॉल करणे आणि नंतर त्याचा मृतदेह सापडणे हे अनेक प्रश्न उपस्थित करतात. या सर्व बाबी लक्षात घेऊन तपास करण्यात येत आहे. ज्या अनोळखी फोन नंबरवरून हा कामगार फोनवर बोलून सकाळी घराबाहेर पडला होता, त्या नंबरचीही पोलीस चौकशी करत आहेत. या वर्षात दक्षिण काश्मीरमधील अन्य कोणत्याही राज्यातील नागरिकाची हत्या झाल्याची ही चौथी घटना आहे.
हे देखील वाचा : पुण्यात ग्रंथालयामध्ये आग; पुस्तकांचे मोठे नुकसान
यावर नवनियुक्त जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करुन आपली नाराजी जाहीर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, दक्षिण काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या हातून अशोक चौहान यांच्या मृत्यूबद्दल ऐकून खूप वाईट वाटले. हे हल्ले घृणास्पद आहेत आणि शक्य तितक्या कठोर शब्दात निषेध केला पाहिजे. मी मृतांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना माझ्या संवेदना पाठवतो, अशा भावना ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केल्या आहेत.
Very sorry to hear about the death of Ashok Chouhan at the hands of militants in South Kashmir. These attacks are abhorrent & must be condemned in the strongest possible terms. I send my condolences to the family & loved ones of the deceased.
— Omar Abdullah (@OmarAbdullah) October 19, 2024