खासदार संजय राऊत व कॉंग्रेस नेते नाना पटोले यांच्यामध्ये राजकीय कलगीतुरा सुरु आहे. (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरुन मतभेद असले तरी बोलणी अद्याप सुरु आहे. महाविकास आघाडीची उमेदवारांची यादी आणि जागावाटप फॉर्म्युला अद्याप समोर आलेला नाही. संभाव्य यादी समोर आलेली असली तरी अधिकृत यादी जाहीर होणे बाकी आहे. दरम्यान, आघाडीतील दोन बड्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असल्याचे समोर आले आहे.
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन यापूर्वी ठाकरे गट व कॉंग्रेस पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. आता खासदार संजय राऊत व कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये वादविवाद सुरु आहे. माध्यमांसमोर या दोन्ही नेत्यांची नाराजी समोर आली आहे. भर पत्रकार परिषदेमध्ये नाना पटोले यांनी संजय राऊतांच्या टीकेवर रोष व्यक्त केला. त्याचबरोबर संजय राऊतांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या या दोन नेत्यांमध्ये सारं काही आलबेल सुरु नसल्याचं स्पष्ट दिसून आलं आहे.
हे देखील वाचा : पुण्यात ग्रंथालयामध्ये आग; पुस्तकांचे मोठे नुकसान
नाना पटोले यांना पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांबाबत सवाल करण्यात आला होता. यावेळी त्यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला होता. यावेळी नाना पटोले म्हणाले की, नाना पटोले म्हणाले, “संजय राऊत हे कदाचित उद्धव ठाकरे साहेबांपेक्षा मोठे नेते असतील. त्यांना उद्धव ठाकरेंशी बोलावे लागत नसेल. पण आमच्या पक्षात एक प्रोटोकॉल आहे. आमचे पक्षश्रेष्ठी दिल्लीत आहेत. आम्हाला सर्व निर्णयांची माहिती त्यांना द्यावी लागते. तिकडे जयंत पाटील यांना सर्व माहिती शरद पवारांना द्यावी लागते. कदाचित शिवसेनेत ही पद्धत नसेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे,” असा घणाघात नाना पटोले यांनी केला. त्यामुळे संजय राऊत व नाना पटोले यांच्यामधील खटके समोर आले.
तुम्ही माझ्या तोंडी घालू नका
आता खासदार संमहाकालच्या गाभाऱ्यात बंदी फक्त सामान्यासांठी; खासदार श्रीकांत शिंदेंनी शिवलिंगांची पूजा केल्याने विरोधक आक्रमक
जय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये उत्तर दिले आहे. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी नाना पटोले यांच्यासोबतच्या वादावर वक्तव्य केले. संजय राऊत म्हणाले, “नाना पटोले जागा वाटपात अडवणुकीची भूमिका घेत आहेत का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मी असे म्हटलेले नाही. तुम्ही माझ्या तोंडी घालू नका. मी व्यक्तिगतरित्या कोणावरही मतप्रदर्शन केलेले नाही. तेवढी सभ्यता, सुसंस्कृतपणा आमच्यात आहे. प्रत्येक आघाडीत जागा वाटपाचा कुठेतरी अडथळा निर्माण होतो. मी व्यक्तिगत कोणावरही टीका केलेली नाही. माझी भूमिका ही पक्षाची असते. उद्धव ठाकरे यांच्या परवानगीशिवाय मी कधीही काहीही बोलत नाही,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.