Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi Tea Party : संसदेच्या पायऱ्यांवर विरोधकांची ‘चायपार्टी’! राहुल गांधींवर भाजपने साधला निशाणा

Rahul Gandhi Tea Party : संसदेच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार आंदोलन केले. मात्र लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पायऱ्यांवर बसून चहा-बिस्किट खाल्ल्याने वाद निर्माण झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 13, 2026 | 04:58 PM
Congress Rahul Gandhi tea party on the steps ofParliament, BJP leaders are aggressive

Congress Rahul Gandhi tea party on the steps ofParliament, BJP leaders are aggressive

Follow Us
Follow Us:
  • संसदेच्या पायऱ्यांवर विरोधकांची चाय पार्टी
  • राहुल गांधींनी चहा -बिस्किट खाल्यामुळे वाद
  • गॅस टंचाईवरील आंदोलनावेळी घडला प्रकार
Rahul Gandhi Tea Party : नवी दिल्ली : सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु आहे. यंदाचे अधिवेशन हे आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे भारतावर झालेल्या परिणामांवरुन रंगले आहे. भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये एलपीजी गॅसचा (LPG Gas) तुटवडा निर्माण झाला असून याचा फटका सामान्य लोकांना बसला आहे. दरम्यान, विरोधकांनी यावरुन सरकारवर जोरदार टीका केली आहे. संसदेच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार आंदोलन केले. मात्र लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पायऱ्यांवर बसून चहा-बिस्किट खाल्ल्याने वाद निर्माण झाला आहे. सत्ताधाऱ्यांनी या कृतीवरुन जोरदार टीका केली आहे.

 

 

देशामध्ये युद्धामुळे एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने विरोधकांनी संसदेच्या आवारामध्ये चूल मांडली होती. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मोदी सरकरावर टीका करण्यात आली. तसेच हे परराष्ट्र धोरणाचे अपयश असल्याचे देखील विरोधकांनी म्हटले आहे. यामुळे राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये विरोधकांनी केलेल्या आंदोलनामध्ये गॅस तुटवड्यावरुन आक्रमक भूमिका घेतली. मात्र यावेळी संसदेच्या आवारात राहुल गांधींसह इतर विरोधी खासदारांनी चहा-बिस्किट खाल्ले. याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी देखील पलटवार केला आहे.

Rahul Gandhi protesting against so called LPG shortage by drinking tea in Parliament Sometimes he reminds of Bollywood movie Taare zameen par 😂pic.twitter.com/qbZvSY1m2m — Frontalforce 🇮🇳 (@FrontalForce) March 13, 2026

हे देखील वाचा : अजित पवार अपघात की घातपात? ‘ब्लॅक बॉक्स’मध्ये छेडछाड होत असल्याचा रोहित पवारांचा खळबळजनक दावा

संसदेच्या आवारातील या चहाच्या पार्टीवरुन किरण रिजिजू यांनी लोकसभेमध्ये मुद्दा उपस्थित करत टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, जर त्यांचे नेते (राहुल गांधी) सुधारले नाहीत तर इतर काँग्रेस सदस्यही सुधारणार नाहीत. आज, लोकसभा अध्यक्षांनी स्वतः वारंवार सांगितले की अविश्वास प्रस्तावावर दोन दिवसांच्या चर्चेनंतर परिस्थिती सुधारली पाहिजे. परंतु सुधारणा होण्याऐवजी, काँग्रेस सदस्य संसदीय सभेत अन्न आणि पेये घेऊन बेशिस्तपणा दाखवत आहेत. काँग्रेस नेत्यांना वाटते की ते नाट्यमय कृतींद्वारे जनतेचे लक्ष वेधू शकतात, परंतु विरोधी सदस्यांच्या अशा कृतींमुळे जनता संतप्त आहे आणि म्हणूनच ते सत्तेत येऊ शकत नाहीत.काँग्रेस पक्षात त्यांच्या नेत्याशी (राहुल गांधी) तर्क करू शकणारा कोणीही शिल्लक नाही, कारण त्यांच्या नेत्यासह सर्व काँग्रेस सदस्यांचे वर्तन बिघडले आहेविरोधी सदस्यांकडे अजूनही वेळ आहे. त्यांनी स्वतःला सुधारले पाहिजे, अन्यथा जनता त्यांना पुन्हा शिक्षा करेल, अशी टीका किरण रिजिजू यांनी केली.

हे देखील वाचा : गॅस टंचाईवर CM देवेंद्र फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक! महाराष्ट्र सरकारने घेतले ‘हे’ पाच निर्णय

देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संसदेच्या आवारामध्ये बसून अशा प्रकारे चहा बिस्किट खाल्यामुळे सभापतीही नाराज झाल्या आहेत. सभागृहाच्या अध्यक्षा संध्या राय यांनीही विरोधकांच्या गोंधळावर नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “विरोधी सदस्यांचे हे वर्तन योग्य नाही. ते लोकशाहीच्या प्रतिष्ठेचेही उल्लंघन करते. जनता त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.” राय यांनी विचारले, “आपण या देशातील तरुणांना काय शिकवत आहोत?” त्यानंतर त्यांनी सभागृह दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले.

Web Title: Congress rahul gandhi tea party on the steps ofparliament bjp leaders are aggressive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • LPG Gas
  • political news
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

हर्षवर्धन सपकाळांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल; ‘तिरंग्याचे प्रेम आता जागे झाले, देर आये दुरुस्त आये’
1

हर्षवर्धन सपकाळांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल; ‘तिरंग्याचे प्रेम आता जागे झाले, देर आये दुरुस्त आये’

Rahul Gandhi: राहुल गांधी म्हणजे ‘बिघडलेले शहजादे’! गृहमंत्री संसदेत येताच…; भाजप खासदाराचा घणाघात
2

Rahul Gandhi: राहुल गांधी म्हणजे ‘बिघडलेले शहजादे’! गृहमंत्री संसदेत येताच…; भाजप खासदाराचा घणाघात

Ethanol Stove : महागड्या LPG सिलिंडरपासून होणार सुटका? एथेनॉलने स्वयंपाक करणं शक्य? सरकारची काय आहे योजना?
3

Ethanol Stove : महागड्या LPG सिलिंडरपासून होणार सुटका? एथेनॉलने स्वयंपाक करणं शक्य? सरकारची काय आहे योजना?

Kangana Ranaut On Rahul Gandhi: संसदेतील चर्चेवरून कंगना रनौत आक्रमक; राहुल गांधींवर साधला थेट निशाणा
4

Kangana Ranaut On Rahul Gandhi: संसदेतील चर्चेवरून कंगना रनौत आक्रमक; राहुल गांधींवर साधला थेट निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.