Delhi CM Attack News: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सिव्हिल लाईन्स येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानी जनसुनावणीदरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हा सर्व प्रकार घडला. रेखा गुप्ता यांच्या निवासस्थानी जनसुनावणी सुरू असतानाच एका व्यक्तीने त्यांना थप्पड मारली. पण काही क्षणातच रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Share Market Today: इंडियन ऑईलसह आज खरेदी करा हे शेअर्स, तज्ज्ञांनी केली शिफारस; तुम्हीही होऊ शकता
यासंदर्भात बोलताना दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर म्हणाले की, “३५ वर्षीय एक व्यक्ती जनसुनावणीला आला होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांना काही कागदपत्रे दिली. त्यानंतर काही वाद झाला. त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा हताश झालेल्या पक्षाचा असू शकतो. २० फेब्रुवारी २०२५ रोजी रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपच्या वंदना कुमारी यांचा २९,५९५ मतांनी पराभव केला. रेखा दीर्घकाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित आहेत. मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्या दिल्ली भाजपच्या सरचिटणीस आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा देखील राहिल्या आहेत.
शैलेंद्र कुमार या प्रत्यक्षदर्शी म्हणाले की, मी उत्तम नगरहून गटाराबद्दल तक्रार घेऊन आलो होतो. पण मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या गेटवर पोहोचताच गोंधळ उडाला. मुख्यमंत्र्यांना मारहाण झाल्याचे कळले, हे पूर्णपणे चुकीचे आहे. तर, जर दिल्लीचे मुख्यमंत्रीच सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाची काय स्थिती असेल? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्यावर दिल्ली काँग्रेसचे प्रमुख देवेंद्र यादव म्हणाले की, “ही घटना दुर्दैवी आहे. रेखा गुप्ता संपूर्ण दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत. अशा घटनांचा कितीही निषेध केला तरी पुरेसा नाही. या घटनेने महिलांच्या सुरक्षा व्यवस्थेचा पर्दाफाश केला आहे. जर दिल्लीचे मुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सामान्य माणूस किंवा महिला कशी सुरक्षित राहू शकते? असं यादव यांनी विचारलं आहे.
Mumbai Rains Live: मुंबईत पुन्हा पावसाचा Red Alert, 24 तासाच 6 मृत्यू, 5 बेपत्ता; अनेक ट्रेन्स रद्द
दरम्यान, ३० नोव्हेंबर २०२४ रोजी दिल्लीतील ग्रेटर कैलाश भागात एका व्यक्तीने केजरीवाल यांच्यावर पाणी फेकत त्यांच्यावर हल्ला केला होता. पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला जागीच मारहाण केली होती. केजरीवाल यांच्यावर हल्ला केलेल्या व्यक्तीचे नाव अशोक झा असे आहे. तो खानपूर डेपोमध्ये बस मार्शल म्हणून तैनात होता. केजरीवालांवर हल्ला केल्यानंतर ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. तथापि, त्यानंतर कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
मार्च २०२२: गुजरात दौऱ्यावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर कोणीतरी प्लास्टिकची बाटली फेकली होती. पण सुदैवाने बाटली केजरीवालांना लागली नाही. मागून फेकलेली बाटली त्यांच्या अंगावरून दुसऱ्या बाजूला गेली. ही घटना घडलेल्या ठिकाणी गर्दी होती, त्यामुळे बाटली फेकणाऱ्या व्यक्तीची ओळख पटू शकली नाही.