Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP protest Update: पोलिसांनी विद्यार्थीनीला मारहाण केली छातीवर …! अभिजीत संतापला

आम्ही मोर्चा इथेच थांबवला याचे कारण,  आम्हाला मुलांची चिंता होती. कोणाला मारहाण व्हावी, मुले जखमी व्हावीत अशी आमची इच्छा नव्हती. मी स्वत: पाहिलं, कशा पद्धतीने मुलांवर हल्ले सुरू होते, त्यांची हात-पाय तोडले जात होते. त्यांची डोकी फोडली जात होती. अजून मुलांना मारहाण व्हावी, ती जखमी व्हावीत अशी माझी इच्छा नव्हती.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 21, 2026 | 10:06 AM
Jantar Mantar, Abhijit Dipke, CJP Protest, Delhi Police

Jantar Mantar, Abhijit Dipke, CJP Protest, Delhi Police

Follow Us
Follow Us:
  • मंगळवारी सकाळपासूनच शेकडो आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर जमा होण्यास सुरुवात
  • आज कोणाचातरी खून झालाच पाहिजे हेच पोलिसांना हवे होते
  • आमचा मोर्चा शांततापूर्ण होता. दिल्ली पोलिसांनीच पहिल्यांदा लाठीचार्ज सुरू केला.
 

CJP protest Update: दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) आंदोलन पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  सोमवारी पोलिसांनी आंदोलकांना जंतरमंतरवरून हटवले असले, तरी मंगळवारी सकाळपासूनच शेकडो आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आंदोलकांनी तिथे पुन्हा स्टेज उभारून आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान कालच्या संसदेवरील मोर्चादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीवरून अभिजीत दिपके यांनी संताप व्यक्त केला आहे. 

काय म्हणाले अभिजीत दिपके?

आंदोलनानंतर माध्यमांशी बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की,  ” एका मुलीने मला मला सांगितले,  पोलिस मुलींचे गळे पकडत होते,  पोलिसांनी एका मुलीचे कपडे फाडले, डिटेश्ननमध्ये जाऊन तिच्या छातीवर पाय ठेवले, पोलिस अंदाधुंद  लाठीचार्ज करत होते. विद्यार्थ्यांची डोकी फोडत  होते. पोलिसांनी कशाचीही चिंता नव्हती, आज कोणाचातरी खून झालाच पाहिजे हेच पोलिसांना हवे होते. पण मला हे नको होते. ही मुले माझ्या सांगण्यावरून इथे आली होती. या मुलांचा आयुष्यासाठी  आम्ही आमचा मोर्चा इथे थांबवला, जर कोणाला काही झाले असते तर दिल्ली पोलिसांनी कोणाला तोंड  दाखवले असते. “

Delhi Capitals च्या Abishek Porel कायद्याच्या कचाट्यात, लवकरच होणार अटक; महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप

दिल्ली पोलिसांना स्वत:ची मुले  नाहीत का?

आमचा मोर्चा शांततापूर्ण होता. दिल्ली पोलिसांनीच पहिल्यांदा लाठीचार्ज सुरू केला. दिल्ली पोलिसांनी खूप वाईट पद्धतीने मुलांना मारहाण केली आहे.  म्हणून सोनम वांगचुक सरांनी  उपोषण सोडण्यास नकार दिला आहे. दिल्ली पोलिसांच्या या वर्तणुकीमुळेच वांगचुक यांनी उपोषण  सोडणार नसल्याचे म्हटले आहे. दिल्ली पोलिसांना स्वत:ची मुले  नाहीत का, घरी जाऊन ते त्यांच्या मुलांना काय तोंड दाखवत असतील,असा  संतप्त सवालही अभिजीतने उपस्थित केला.

 

या मुलांवर लाठीचार्जचे आॉर्डर देणारी सरकार इतकी निर्दयी कशी असू शकते

आम्ही मोर्चा इथेच थांबवला याचे कारण,  आम्हाला मुलांची चिंता होती. कोणाला मारहाण व्हावी, मुले जखमी व्हावीत अशी आमची इच्छा नव्हती. मी स्वत: पाहिलं, कशा पद्धतीने मुलांवर हल्ले सुरू होते, त्यांची हात-पाय तोडले जात होते. त्यांची डोकी फोडली जात होती. अजून मुलांना मारहाण व्हावी, ती जखमी व्हावीत अशी माझी इच्छा नव्हती. म्हणून आम्ही इथेच थांबवला. आमच्यात  इतकी संवेदनशीलता आहे तर या वर्दीतील लोकांमध्ये का नाही. त्यांच्यात थोडीही माणुसकी नाही.  या मुलांवर लाठीचार्ज चे आॉर्डर देणारी सरकार इतकी निर्दयी कशी असू शकते. सगळे जग बघत आहे की विद्यार्थ्यांना कशी मारहाण केली जात आहे.

पोलिस महासंचालकांचा संशयास्पद मृत्यू; पोलीस मुख्यालयातील कार्यालयात आढळला मृतदेह

सौरभ दासवर UAPA अंतर्गत गुन्हा

या सरकारने एकीकडे आम्हाला चर्चेसाठी बोलवलं आणि दुसरीकडे त्याचवेळी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत होती. अजूनही बाहेरच्या बाजुला असणाऱ्या मुलांवर लाठीचार्ज करत आहेत.  सौरभ दासवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सौरभने सोशल मीडियावर जो व्हिडीओ पोस्ट केला आहे तो खोटा असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला, असे विचारले असता अभिजीत म्हणाले की, इथे  काय सुरू आहे, हे कळू नये म्हणून इथे सरकारने जॅमर लावून ठेवले आहेत. त्यामुळे सौरभवर गुन्हा दाखल केला आहे.  आता  त्यांना गुन्हा दाखल करायचा तर करून दे. सगळे नियम-कायदे आमच्यासाठी, जनतेसाठी. मग २० हून अधिक विद्यार्थ्यांनी ज्या माणसामुळे आत्महत्या केली, त्यांच्यावर काय कारवाई करणार हे सरकार,” असा सवाल अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला आहे.

 

 

Web Title: Delhi police brutally beat up a female student abhijit dipke outraged

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Cockroach Janata Party
  • Delhi Police
  • Student Protest

संबंधित बातम्या

‘विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांवरच..,’ दिल्लीतील आंदोलनावर जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य
1

‘विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांवरच..,’ दिल्लीतील आंदोलनावर जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य

दिल्लीतील आंदोलनावर सरकारची पहिली मोठी प्रतिक्रिया; जे.पी. नड्डांचे आंदोलकांना आवाहन, ‘आंदोलन मागे घ्या’
2

दिल्लीतील आंदोलनावर सरकारची पहिली मोठी प्रतिक्रिया; जे.पी. नड्डांचे आंदोलकांना आवाहन, ‘आंदोलन मागे घ्या’

CJP Protest: ‘मागण्या पूर्ण होईपर्यंत शांत बसणार नाही; जे.पी. नड्डा यांच्या भेटीनंतर  सौरभ दास यांची प्रतिक्रीया
3

CJP Protest: ‘मागण्या पूर्ण होईपर्यंत शांत बसणार नाही; जे.पी. नड्डा यांच्या भेटीनंतर सौरभ दास यांची प्रतिक्रीया

‘विश्वगुरू झुरळांना घाबरतात’; दिल्लीतील आंदोलनावरून सुषमा अंधारेंचा मोदी सरकारवर घणाघात, ‘लोकशाही शेवटचा घटका मोजत आहे’
4

‘विश्वगुरू झुरळांना घाबरतात’; दिल्लीतील आंदोलनावरून सुषमा अंधारेंचा मोदी सरकारवर घणाघात, ‘लोकशाही शेवटचा घटका मोजत आहे’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.