धक्कादायक! बलात्काराच्या आरोपाखाली क्रिकेटर अभिषेक पोरेलला होणार अटक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
या महिलेचा आरोप आहे की, क्रिकेटपटूने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि त्यांच्या खाजगी क्षणांचे चित्रीकरण केले. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे, “याचिकाकर्त्याकडून एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला आहे. पेन ड्राइव्हवर सापडलेल्या काही पुराव्यांवरून हे सिद्ध होते की, पोरेलची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यासाठी त्याला अटक करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यातील डेटा इतरांसोबत शेअर केला जाऊ नये.”
तीन वर्षे जुन्या प्रकरणात पोरेल अडचणीत
‘द इंडियन एक्सप्रेस’मधील एका वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या अभिषेक पोरेलने जानेवारी २०२३ मध्ये तक्रारदार महिलेशी संपर्क साधला होता, त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. २३ वर्षीय क्रिकेटपटूवर आरोप आहे की, त्याचे आई-वडील बाहेरगावी असताना त्याने त्या महिलेला मानकुंदू येथील आपल्या फ्लॅटमध्ये नेले.
तक्रारदार महिलेचा आरोप आहे की, पोरेलने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. नंतर दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाबद्दल चर्चा झाली असली तरी, तक्रारदार महिलेने नंतर आरोप केला की, पोरेलचे इतर महिलांसोबतही शारीरिक संबंध असल्याचे तिला समजले.
मोगरा पोलिसांकडे दाखल केलेली तक्रार
मोगरा पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, “अभिषेक पोरेलने याचिकाकर्तीला बेकायदेशीरपणे डांबून ठेवले, तिला जेवण करण्यापासून रोखले आणि जाणीवपूर्वक तिला एकाकी पाडले. २ एप्रिल २०२६ रोजी दिल्लीत घडलेल्या या घटनेमुळे, याचिकाकर्ती अत्यंत अशक्त झाली आणि तिला नीट चालता येत नव्हते. दुसऱ्या दिवशी विमानप्रवासाचे नियोजन असूनही, झालेल्या जखमांमुळे याचिकाकर्तीला तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी लागली.”
अभिषेक पोरेलचे करिअर या प्रकरणामुळे संपुष्टात आले असल्याची आता चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान अभिषेक पोरेलने एकदाही या प्रकरणावर कोणतेही स्पष्टीकरण वा मुलाखत दिलेली नाही. त्यामुळे अभिषेक खरंच दोषी आहे का? असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.
9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…






