श्रीनगर : लाखो भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra) दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक येथे दर्शनासाठी येत असतात, पण पावसामुळं किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळं (Due to rain or other natural disasters) येथे भाविकांवर संकट ओढावल्याचे आपण या आधी सुद्धा पाहिले आहे. या वर्षी सुद्धा सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. हजारो भाविक जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) असलेल्या अमरनाथमध्ये महादेवाच्या दर्शनासाठी (God Mahadev Darshan) गेले आहेत, मात्र अमरनाथच्या यात्रेला गेलेल्या तब्बल 10 ते 15 हजार भाविकांवर आज मोठं संकट कोसळलं आहे. अमरनाथमध्ये ढगफुटीमुळं (Due to cloudburst) 5 भाविकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. बचावाचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
[read_also content=”९२ नगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगूल वाजलं, राज्य निवडणूक आयोगाची घोषणा https://www.navarashtra.com/maharashtra/election-of-92-municipalities-in-the-state-announced-inclusion-of-4-nagar-panchayats-announcement-of-election-commission-302163.html”]
दरम्यान, अमरनाथमध्ये होली गुहेजवळ अचानक ढगफुटीसारखा मोठा पाऊस (Cloudburst in Amarnath) झाला. या ढगफुटीमुळे गुहेजवळ पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने अक्षरश: हाहाकार माजवल्याने या घटनेत आतापर्यंत 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 10 ते 15 हजार भाविक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
#WATCH | J&K: Visuals from lower reaches of Amarnath cave where a cloud burst was reported at around 5.30 pm. Rescue operation underway by NDRF, SDRF & other associated agencies. Further details awaited: Joint Police Control Room, Pahalgam (Source: ITBP) pic.twitter.com/AEBgkWgsNp — ANI (@ANI) July 8, 2022
या ढगफुटीमुळं सध्या अमरनाथमध्ये हजारो भाविक अडकून पडले आहेत. यामुळं नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी रेस्क्यू टीम पोहोचली आहे. पोलिसांनी केलेल्या रेस्क्यूत आतापर्यंत दोन भाविकांचे मृतदेह सापडले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाले असून, बचावाचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे.