नथुराम गोडसे खुनी आहेत? धीरेंद्र शास्त्रींची स्पष्ट प्रतिक्रिया, महात्मा गांधींबाबत मोठं विधान
Dhirendra Shastri on nathuram Godse: मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्यावर टीकाटिपण्ण्याही होतात. अशातच अलीकडे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महात्मा गांधी आणि नथुराम गोडसेवर आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रीयेमुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी धीरेंद्र शास्त्री यांना नथुराम गोडसे देशभक्त होते का, असा प्रश्न विचारला. यावर बोलताना शास्त्री म्हणाले की, “नथुराम देशभक्त आहे की नाही, लोकांचे स्वतःचे मत आहे. पण माझ्य मते, महात्मा गांधींनी देशासाठी जे काही केले ते अभूतपूर्व होते. मी त्यांचा खूप आदर करतो.”
यानंतर तर नथुराम खुनी आहे का? असा प्रश्न विचारला असता “कोणतीही शहानिशा न करता तुम्ही अशा कोणालाही मारू शकत नाही. जे चांगले आहे, वाईट आहे. त्यांना तुम्ही कायद्याच्या हातात सोपवले पाहिजे. संविधान याच कारणासाठी बनवले गेले आहे, असे धीरेंद्र शास्त्रींनी सांगितले. त्यानतंर तुमच्या मते स्वातंत्र्याचा नायक कोण आहे? शास्त्री म्हणाले, सुभाषचंद्र बोस. आम्ही त्यांचा खूप आदर करतो. त्यांच्याशिवाय भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद हे देखील भारताच्या स्वातंत्र्याचे नायक आहेत.
Congress on RSS: लाल किल्ल्यावरून मोदींकडून RSSचे कौतुक…; काँग्रेस नेत्यांनी थेट इतिहासच काढला
तुमच्या मते अशी कोणतीही महिला आहे का जी स्वातंत्र्य चळवळीची नायिका कोण आहे? या प्रश्नावर हसत हसत धीरेंद्र शास्त्री म्हणाले – अनेक महिला आहेत. स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी असलेल्या सर्व महिलांचा आम्ही आदर करतो. असंही त्यांनी नमुद केलं. आपण रिल्स पाहता का, यावर बोलताना, कधीकधी पाहत असल्याचे शास्त्रींनी मान्य केले. तसेच मी खूप व्यस्त असल्याने आणि माझा वेळ बालाजींची सेवा करण्यात जात असल्याने मला मोबाईल फार वेळ वापरता येत नाही. असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
जेव्हा देशात ऑपरेशन सिंदूरची चर्चा होती, तेव्हा राहुल गांधींनी असेही म्हटले की त्यांनी घरात घुसून हल्ला केला. खूप चांगले काम झाले. पण किती नुकसान झाले हे सांगण्यात सरकारला काय अडचण आहे? या प्रश्नावरही धीरेंद्र शास्त्रींनी उत्तर दिले. ते म्हणाले की, लपवण्यात काहीच अर्थ नाही, सत्य बोलण्यात काय अडचण आहे? ते कोणत्या पक्षाचे आहे हे महत्त्वाचे नाही. आम्ही कोणाच्याही बाजूने नाही. आम्ही साधू आहोत. आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही. आम्ही सत्याचे उपासक आहोत. तसेच, आपल्याला बाहेरच्या दहशतवादापासून मुक्तता मिळेल. पण अंतर्गत दहशतवादापासून कधी मुक्तता मिळेल? आपल्याला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांशी काहीही अडचण नाही, आपण त्यांच्यावर कधीही क्षेपणास्त्रे डागू शकतो. पण आपण देशातील दहशतवाद्यांवर क्षेपणास्त्रे डागू शकत नाही. अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली.
अंतर्गत दहशतवादी कोण?’ या प्रश्नाला उत्तर देताना बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. “आतील लोक तेच आहेत, ज्यांना देशाशी समस्या आहे. ते भारतात राहतात, खातात पण पाकिस्तानची गाणी गातात. काही लोक या ठिकाणाची गुप्तचर माहिती पाकिस्तानला पाठवतात. काहीजण नक्षलवाद, प्रादेशिकता, भाषिकता, समाजवाद आणि जातीयवादाच्या नावाखाली देशाला कमजोर करण्याचा प्रयत्न करतात. आमच्या मते राष्ट्रवादाला महत्त्व दिले पाहिजे,” असे शास्त्री म्हणाले.