Maharashtra breaking News Marathi (Credit- AI)
27 Jan 2026 11:25 AM (IST)
"शिंदे गटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह हे वंदनीय आहेत. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला पण शिंदे सेनेकडून निषेधाचा एक शब्द नाही. शिंदे सेनेला बाळासाहेब वंदनीय नसल्याचे राऊत म्हणाले. शिंदेसेना ही भाजपचं अंगवस्त्र आहे.किती दिवस रुसून बसणार असा सवाल त्यांनी केला. फारतर एखादी साडीचोळी पदरात पाडून घेतली, अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे.
27 Jan 2026 11:15 AM (IST)
मंत्री भरतशेठ गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. "एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणार नाही. विकास गोगावलेच्या अंगात भरत गोगावले आणि सुषमा गोगावलेच रक्त आहे. कार्यकर्त्याच्या वाट्याला गेलेलं आपल्याला सहन होत नाही. न्याय देवतेने आदेश दिला म्हणून मी शरण गेलो," असे विकास गोगावले म्हणाले आहेत.
27 Jan 2026 11:05 AM (IST)
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपद अनुसूचित जमाती (ST) महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत. या आरक्षणामुळे भाजप महापौरपदाच्या शर्यतीतून तांत्रिकदृष्ट्या बाहेर पडला आहे. सध्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या हर्षाली थविल यांचे नाव सध्या सर्वात आघाडीवर आहे.
27 Jan 2026 10:59 AM (IST)
राजकोषीय तूट म्हणजे सरकारच्या एकूण खर्च आणि त्याच्या एकूण उत्पन्नातील (कर्ज वगळता) फरक. सोप्या शब्दात सांगायचे तर सरकारला त्याचे खर्च पूर्ण करण्यासाठी किती कर्ज घ्यावे लागेल याचे गणित. राजकोषीय तूट ही अर्थसंकल्पातील सर्वात बारकाईने पाहिलेल्या मापदंडांपैकी एक आहे, कारण ती सरकारच्या राजकोषीय शिस्तीचे प्रतिबिंबित करते. कमी राजकोषीय तूट म्हणजेच सरकार त्याचा खर्च आणि महसूल नियंत्रित करत आहे, गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवत आहे. दुसरीकडे, उच्च वित्तीय तूट म्हणजे अधिक कर्ज घेणे, ज्यामुळे व्याजदर वाढू शकतात आणि खाजगी गुंतवणुकीवर दबाव येऊ शकतो. शिवाय, ते पायाभूत सुविधा, कल्याणकारी कार्यक्रम आणि संरक्षण यावर खर्च करण्याची सरकारची व्याप्ती निश्चित करते.
27 Jan 2026 10:52 AM (IST)
वर्ल्ड लेजेंड्स प्रो टी२० लीग २६ जानेवारी रोजी सुरू झाली, त्यातील पहिला सामना दिल्ली वॉरियर्स आणि दुबई रॉयल्स यांच्यात खेळला गेला. हरभजन सिंग दिल्ली वॉरियर्सचा कर्णधार होता, तर शिखर धवन दुबई रॉयल्सचा कर्णधार होता. दोन्ही संघांमधील वर्ल्ड लेजेंड्स प्रो टी२० लीग २०२६ चा पहिला सामना गोव्यात खेळला गेला, ज्यामध्ये हरभजन सिंगच्या वॉरियर्सने शिखर धवनच्या रॉयल्सचा पराभव केला. हरभजन सिंगच्या संघाच्या विजयाचा नायक वेस्ट इंडिजचा ४० वर्षीय विकेटकीपर फलंदाज चॅडविक वॉल्टन होता, ज्याने फक्त ४९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
27 Jan 2026 10:44 AM (IST)
सांगलीतून एक निर्घृण हत्येची बातमी समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून एका २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. फक्त मावा मागितल्याचा रागातून ही घटना घडली. हत्या झालेल्या तरुणाचे नाव नारायण पवार असे आहे. पोलिसांनी तिघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.
27 Jan 2026 10:37 AM (IST)
मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने ठसा उमटवणारे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते उपेंद्र लिमये लवकरच एका वेगळ्या आणि प्रभावी खलनायकच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘मन आतले मनातले’ या ॲक्शनपॅक्ड मराठी चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका हे चित्रपटाचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला असून, येत्या १३ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जो प्रेक्षकांना सर्व चित्रपटगृहात पाहता येणार आहे.
27 Jan 2026 10:29 AM (IST)
ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंग व आयपीओमध्ये ५० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवत एका खासगी कंपनीतील संगणक अभियंत्या तरुणाची तब्बल ४३ लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार ५ डिसेंबर २०२५ ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान घडला. मोहन शर्मासह अन्य मोबाईलधारक अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
27 Jan 2026 10:21 AM (IST)
केंद्र सरकारने २०२६ चा पद्म पुरस्कार जाहीर केला आणि ज्येष्ठ दिवंगत अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना पद्मविभूषण जाहीर केले. या बातमीने केवळ देओल कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण चित्रपटसृष्टीला भावनिक आणि आनंदी झाला आहे. धर्मेंद्र यांना पद्मविभूषण मिळाल्याची बातमी समोर येताच लोकांनी आनंद व्यक्त करणाऱ्या पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केली आहे. आता, अनिल शर्मा यांनीही त्यांची आठवण काढून आणि त्यांच्या गौरवशाली वारशाला श्रद्धांजली वाहिली आहे. चित्रपट निर्माते अनिल शर्मा यांनी अलीकडेच धर्मेंद्र यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये, स्टारने त्यांना आठवताना त्यांच्या भावना शेअर केल्या आहेत.
27 Jan 2026 10:12 AM (IST)
जगात अशी अनेक रहस्ये आहेत, ज्यांचा आजपर्यंत उलगडा झालेला नाही. आज मानवाने विज्ञानात, तंत्रज्ञानात मोटी प्रगती केली आहे. परंतु आजही मानवी कर्तृत्वाच्या काही प्राचीन खुणा आपल्याला थक्क करतात.सध्या अशाच एका मोठ्या रहस्याचा उलगडा शास्त्रज्ञांनी केला आहे. ५००- वर्षे जुने असलेले दक्षिण लंडनमधील स्टोनहेंज स्टोन्सतचे मोठे सत्य जगासमोर आले आहे. हे सत्य इतिहासकारांसाठी आणि वैज्ञानिकांसाठी थक्क करणारे आहे.
27 Jan 2026 10:06 AM (IST)
फ्री फायर मॅक्ससाठी अलीकडेच एक नवीन अपडेट जारी करण्यात आले आहे. हे अपडेट जारी झाल्यानंतर गेममध्ये अनेक नवीन ईव्हेंट्स जारी केले जात आहेत. याशिवाय गेममध्ये अनेक बदल देखील होत आहेत. नवीन अपडेटनंतर गेमिंगचा अनुभव पूर्णपणे बदलला आहे. प्लेअर्सना रोज नवीन ईव्हेंट्समध्ये सहभागी होण्याची आणि नवीन रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळत आहे. ईव्हेंट्ससोबतच गेममध्ये रोज नवीन रिडीम कोड्स देखील जारी केले जातात. या कोड्सच्या मदतीने प्लेअर्स आकर्षक रिवॉर्ड्स आणि डायमंड्स क्लेम करू शकतात.
27 Jan 2026 09:35 AM (IST)
महाराष्ट्रातील हवामानात सध्या मोठे बदल होत असून हिवाळा संपत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. एकीकडे थंडीचा कडाका ओसरत असतानाच दुसरीकडे राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे, रायगड आणि नंदूरबारमध्ये पाऊस गेल्या २४ तासांत राज्याच्या काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. ठाणे, नंदूरबार आणि रायगड जिल्ह्यांतील काही भागांत हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. ढगाळ वातावरणामुळे कमाल आणि किमान तापमानातील तफावत कमी झाली असून उकाडा जाणवू लागला आहे. पुढील काही तासांत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीकामांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने बळीराजा चिंतेत आहे.
27 Jan 2026 09:25 AM (IST)
चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता वेग आला असून, अंतिम निर्णयासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आज (२७ जानेवारी) सकाळी मुंबईला रवाना होत आहेत. महापौरपद कोणाला मिळणार आणि कोणाशी युती करायची, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुनगंटीवार यांच्यात होणाऱ्या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
27 Jan 2026 09:25 AM (IST)
भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ICC टी-२० वर्ल्डकप ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मात्र, स्पर्धेपूर्वीच आयसीसीने कठोर निर्णय घेत बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर काढले आहे. आपले सामने श्रीलंकेत खेळवण्याची मागणी बांगलादेशने केली होती, जी आयसीसीने फेटाळत त्यांच्या जागी स्कॉटलंडला स्थान दिले आहे. आयसीसीच्या या निर्णयाचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सुरुवातीला तीव्र विरोध करत स्पर्धेवर बहिष्काराची धमकी दिली होती. मात्र, आयसीसीने कडक इशारा दिल्यानंतर पाकिस्तानने नमते घेत आपला संघ जाहीर केला आहे. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत.
27 Jan 2026 09:17 AM (IST)
भारत आणि युरोपियन महासंघ (EU) यांच्यात आज एका ऐतिहासिक 'मुक्त व्यापार करारावर' (FTA) शिक्कामोर्तब होणार आहे. गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, भारत-युरोपियन महासंघाच्या परिषदेत आज याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. हा करार केवळ द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी नसून, यामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या करारामध्ये प्रामुख्याने वस्तू, सेवा आणि गुंतवणूक या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश असेल. अमेरिकेने लावलेल्या जादा टॅरिफच्या पार्श्वभूमीवर, हा करार भारतासाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस उलटले तरी, अद्याप मुंबईला नवीन महापौर मिळू शकलेला नाही. महापौरपद आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात सुरू असलेल्या अंतर्गत ओढाताणीमुळे महायुतीमधील पेच अधिकच गडद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी लावून धरली आहे. तसेच स्थायी समितीसह अन्य महत्त्वाच्या समित्यांमध्येही शिवसेनेला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, असा त्यांचा आग्रह आहे. मात्र, भाजपने या मागण्यांबाबत अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.






