महिलांनी धूम्रपान करणे किती धोकादायक (फोटो सौजन्य - iStock)
पुरुष आणि महिलांमधील धूम्रपानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे . काही जण समवयस्कांच्या दबावामुळे धूम्रपान करतात , तर काही ताणतणावामुळे धुम्रपानाच्या आहारी जातात. धुम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज (सीओपीडी), हृदयरोग आणि स्ट्रोक यासारख्या अनेक आरोग्य समस्यांशी उद्भवतात. महिलांच्या शरीरावर धूम्रपानाचा परिणाम पुरुषांपेक्षा अधिक घातक ठरतो. डॉ. पद्मा श्रीवास्तव, वरिष्ठ प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, लुल्लानगर, पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
कसा होतो परिणाम?
सिगारेटमधील निकोटिन आणि इतर रसायनांमुळे फुफ्फुस, हृदय आणि प्रजनन प्रणालीवर परिणाम होतो. धूम्रपानामुळे इस्ट्रोजेनचे प्रमाण घटते, अंडाशयांवर दुष्परिणाम होतो आणि प्रजनन क्षमतेत घट येते. धूम्रपान रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवते आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी करते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची शक्यता वाढते. धूम्रपानामुळे महिलांच्या त्वचेचे वय वाढते, ज्यामुळे त्वचेला निस्तेजपणा येतो, सुरकुत्या पडतात आणि केस पातळ होतात. कालांतराने हाडं कमकुवत होतात आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढतो.
धुम्रपान सोडणं अवघड असेल तर या मार्गानी करा ते सोपे
कशी पोहचते हानी?
सेकंडहँड स्मोकिॅगनेही महिला आणि त्यांच्या कुटुंबांना, विशेषतः मुलांना हानी पोहोचू शकते. धूम्रपान करण्याची सवय तुमच्या प्रजनन क्षमतेला हानी पोहोचवू शकते. धूम्रपानामुळे प्रजनन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते, प्रजनन क्षमता कमी होऊ शकते आणि अकालीरजोनिवृत्ती देखील होऊ शकते. गर्भधारणेदरम्यान धूम्रपान करणाऱ्या महिलांना अकाली प्रसुती, कमी वजनाचे बाळ आणि बाळाला विकासात्मक समस्या यासारख्या गुंतागुंतीचा धोका असतो. धूम्रपानामुळे स्त्रीबीजाच्या गुणवत्तेवर देखील परिणाम होतो, ज्यामुळे महिलांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा करणे कठीण होते. म्हणूनच, महिलांसाठी धूम्रपान टाळणे गरजेचे आहे.
धूम्रपानाची सवय कशी सोडाल?






