पुरी : जगन्नाथ मंदिर प्रशासनाने 12 व्या शतकातील या धार्मिक स्थळामध्ये शॉर्टस्, फाटलेल्या जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस कपडे परिधान केलेल्या भाविकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. त्यांच्यासाठी ‘ड्रेस कोड’ अनिवार्य केला आहे. त्यांनी नवीन वर्षापासून मंदिर परिसरात गुटखा आणि पान खाण्यावर आणि प्लास्टिक आणि पॉलिथिनच्या वापरावर पूर्ण बंदी घातली आहे.
जगन्नाथ मंदिर प्रशासनाच्या (एसजेटीए) एका अधिकाऱ्याने सांगितले की, मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांना सभ्य कपडे घालावे लागतील. हाफ पँट, शॉर्टस्, फाटलेली जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस कपडे परिधान केलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
हा नियम लागू झाल्यानंतर 2024 च्या पहिल्या दिवशी मंदिरात येणारे पुरुष भक्त धोतर आणि टॉवेल परिधान करताना आणि महिला साडी किंवा सलवार कमीजमध्ये दिसल्या. एसजेटीएने यापूर्वी या संदर्भात एक आदेश जारी केला होता.