अहमदाबाद : गुजरातमधील (Gujarat) सुरत (Surat) जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे (earthquake) सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.8 इतकी मोजली गेली. इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मोलॉजिकल रिसर्च (ISR) च्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ISR अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू सूरतच्या पश्चिम-नैऋत्येला सुमारे 27 किमी अंतरावर होतं. सकाळी 12.52 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.
[read_also content=”पत्रकार वारिसे यांच्या हत्येमागे असलेल्या मास्टरमाईंडला अटक करा, शिवसेना खासदार संजय राऊत यांची मागणी, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र https://www.navarashtra.com/maharashtra/sanjay-raut-demand-to-arrest-main-accused-who-is-behind-murder-of-journalist-shashikant-varise-nrps-368929.html”]
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू भूपृष्ठापासून ५.२ किमी खोलीवर होता. हे जिल्ह्यातील हजीराजवळ अरबी समुद्रावर वसले होते. भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानुसार, राज्याने 1819, 1845, 1847, 1848, 1864, 1903, 1938, 1956 आणि 2001 मध्ये मोठे भूकंप पाहिले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सूरतमध्ये भूकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही. काही लोकांना भूकंपाचे हलके धक्के जाणवले. भूकंप सुरत शहरापासून सुमारे 27 किमी अंतरावर होता. सुरतमधील हाजिराजवळ अरबी समुद्रात झालेल्या भूकंपामुळे शहर पूर्णपणे सुरक्षित आहे.