
Ebola व्हायरसबाबत केंद्र सरकार सतर्क! (Photo Credit- AI)
इबोला व्हायरसचा प्रादुर्भाव सध्या मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये वेगाने होत आहे. काँगो, युगांडा, सुदान, गिनी, लायबेरिया आणि सिएरा लिओन या देशांमध्ये या आजाराने आतापर्यंत १३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे ५०० हून अधिक जण बाधित आहेत. यामुळे भारत सरकारने विशेषतः काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांमधून थेट किंवा इतर मार्गाने भारतात येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच सखोल तपासणी सुरू केली आहे.
DGHS (Directorate General of Health Services) issues passenger advisory regarding Ebola Virus pic.twitter.com/KI4BwX9UqP — ANI (@ANI) May 21, 2026
केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बाधित देशांतून येणाऱ्या प्रवाशांमध्ये संसर्गाची कोणतीही लक्षणे आढळल्यास, त्यांनी इमिग्रेशन तपासणीपूर्वीच विमानतळावरील हेल्प डेस्क किंवा आरोग्य अधिकाऱ्यांना त्वरित माहिती देणे बंधनकारक आहे. याशिवाय, कोणताही प्रवासी नकळत जरी एखाद्या इबोला बाधिताच्या संपर्कात आला असेल, तर त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागाला कळवण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. इबोलाबाबत गांभीर्य न बाळगल्यास कोरोना महामारीसारखी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यांना कोणत्याही संभाव्य संकटाशी लढण्यासाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले असून, केंद्र सरकारने एक विशेष SOP (Standard Operating Procedure) देखील सोपवली आहे. या SOP मध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश आहे:
इबोला हा ‘ऑर्थोइबोला व्हायरस’ (Orthoebolavirus) परिवारातील एक जीवघेणा जूनोटिक (प्राण्यांपासून मानवात पसरणारा) व्हायरस आहे. संसर्ग झाल्यास शरीरात खालील लक्षणे दिसून येतात: