लखनौ : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) वाराणसीहून लखनऊला (Varanasi To Lucknow) जात होते. त्यानंतर हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग (Helicopter Emergency Landing) करण्यात आली. सीएम योगींच्या हेलिकॉप्टरवर अचानक पक्षी आदळला, त्यामुळे मोठी दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या पक्ष्याच्या धडकेनंतर त्यांच्या हेलिकॉप्टरचे वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. दरम्यान कोणालाही दुखापत झाली नाही.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पूर्णपणे सुरक्षित (Safe) आहेत. या घटनेनंतर चौकशी (Inquiry) करण्यात येत आहे. हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेनंतर सीएम योगींना पर्याय म्हणून दुसरे हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ वाराणसीहून लखनऊला जात होते, मात्र उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच पक्षी हेलिकॉप्टरला धडकले, त्यानंतर त्यांना उतरावे लागले.
जेव्हाही अशी घटना घडते, तेव्हा हेलिकॉप्टर उतरवले जाते. त्यानंतर तांत्रिक पथक त्याची कसून तपासणी करते आणि जोपर्यंत सर्व काही ठीक आहे याची खात्री होत नाही, तोपर्यंत व्हीआयपी हेलिकॉप्टरला उड्डाण करण्यास परवानगी दिली जात नाही.






