19 एप्रिलपासून सुरू झालेल्या लोकसभा निवडणुका आज अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. आज 1 जून रोजी 8 राज्यांमध्ये 57 जागांवर मतदान पार पडले. ४४ दिवसांच्या निवडणूक प्रक्रियेनंतर ४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. मात्र, त्यापूर्वी देशाचा मूड एक्झिट पोलमध्ये कळेल. यावेळी केंद्रातील सत्ता कोणाच्या हाती जाणार, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३० मिनिटांनंतरच एक्झिट पोल दाखवता येतात. अशा परिस्थितीत संध्याकाळी 6 वाजता मतदान पूर्ण होईल आणि अर्ध्या तासानंतर एक्झिट पोल दाखवला जाईल.
2019 च्या लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर, भाजपच्या खात्यात 303 जागा होत्या. तर काँग्रेसला केवळ 52 जागा जिंकता आल्या. टीएमसीला 22 जागा मिळाल्या होत्या. जेडीयूला 16 तर समाजवादी पक्षाला केवळ पाच जागा मिळाल्या. यूपीमध्ये बसपाला 10 जागा मिळाल्या होत्या.
तामिळनाडूत भाजपाला १ ते ३ जागा – एक्सिस-माय इंडिया पोल्स
एक्सिस माय इंडिया पोल्स
तामिळनाडूमध्ये काय स्थिती
डीएमके – २० ते २२
काँग्रेस – ६ ते ८
एआयडीएमके – ० ते २
भाजपा – १ ते ३
भाजपा खातं उघडण्याची शक्यता…
एनडीए – २ ते ३
इंडिया – ३३ ते ३७इ
इतर – 0