पंजाब : सध्या देशभरात थंडी वाढली आहे. या थंडीपासून वाचण्यासाठी अनेक जण उबदार कपडे, शेकोटीचा आधार घेताना दिसतात. मात्र या शेकोटीने पाच जणांचा जीव घेतल्याची घटना पंजाबमध्ये उघडकीस आली आहे. शेकोटी पेटवून झोपी गेलेल्या पाच मजुरांचा गुदमरल्याने मृत्यू झाला असून एका मजुराची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व मजूर बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
[read_also content=”120 किमी वेगाने धावणाऱ्या चित्त्याचा व्हिडिओ व्हायरल! शिकारीसाठी मारली 22 फूट उडी, पाहणारे दंग https://www.navarashtra.com/viral/cheetah-running-speed-is-about-120-per-km-goes-viral-on-internet-nrps-360362.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, शेलरमध्ये काम करणारे सत्यनारायण साधा, करण साधा, सचिन कुमार, राधे साधा, अमंत कुमार आणि शिवरुद्र हे रविवारी रात्री दहाच्या सुमारास काम आटोपल्यानंतर परिसरातमध्ये बांधलेल्या खोलीत झोपले. रात्री थंडी पासून बचावासाठी त्यांनी शेकोटी पेटवली. सोमवारी सकाळी मजूर कामावर येत नसल्याचे पाहून कामगार कंत्राटदाराने कामगारांना उठविण्यासाठी खोलीचा दरवाजा ठोठावला. दरवाजा न उघडल्याने मालकांना कळवण्यात आले. यानंतर दरवाजा तोडण्यात आला. खोलीत सत्यनारायण साधा, करण साधा, सचिन कुमार, राधे साधा आणि अमंत कुमार मृतावस्थेत आढळले. तर, शिवरुद्रचा श्वास चालू होता त्यामुळे शिवरुद्रला तातडीने सुनम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे.