भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज, मंगळवारी (१७ फेब्रुवारी) मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांची भेट घेतील. या भेटीत संरक्षण सरकार्यापासून ते कृत्रिम बुद्धमत्तेपर्यंतच्या जागतिक मुद्यांवर चर्चा होणार आहेत. या भेटीत दोन्ही देसांत संरक्षण क्षेत्रात अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. अमेरिकेसह संपूर्ण जगाचे लक्ष पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या भेटीकडे लागले आहे. यामुळे या भेटीला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये भारत-फ्रान्स द्विपक्षीय संबंधावर चर्चा होणार आहे. भारत-फ्रान्समधील सामंजस्य कारारावर स्वाक्षरी केली जाईल. यामुळे दोन्ही देशांचे संबंध अधिक बळकट होतील. तसेच दोन्ही देशांत संभाव्य संरक्षण करारांवरही स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. द्विपक्षीय चर्चेदम्यान दोन्ही नेत्यांमध्ये हिंद महासागरातील सुरक्षा आणि धोरणात्मक प्रगीतवर सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.






