Photo Credit- Social Media दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाची पाच प्रमुख कारणे
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) ऐतिहासिक विजय मिळवला. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजपने 48 जागांवर आघाडी घेतली. त्याचवेळी गेल्या 11 वर्षांपासून सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाचा (AAP) मात्र दारूण पराभव झाला. पण अरविंद केजरीवालांचा पराभव हा आपसाठी सर्वात मोठा धक्का होता. मोदी लाट असतानाही अरविंद केजरीवाल यांच्या धोरणांमुळे दिल्लीकरांनी २ टर्म केजरीवालांच्या आपला बहूमताने निवडून दिले. पणयावेळी मात्र दिल्लीकरांनी आपकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीत केजरीवाल सरकारच्या मोफत योजना अपयशी ठरल्या. त्यामुळे देशभरात आपच्या पराभावची चर्चा सुरू आहे. यानंतर केजरीवाल यांच्या पराभवाची कारणेही समोर आली आहेत..
भाजपने दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर खर्च झाल्याचा आरोप केला होता. केजरीवाल यांनी करोडो रुपये खर्च करून आपल्या ‘आम आदमी’च्या प्रतिमेला छेद दिला असल्याचा आरोप भाजपने सातत्याने केला. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, भाजपने ‘शीशमहल’ प्रकरण हत्यार बनवले आणि मोठ्या प्रमाणावर या मुद्द्यावरून केजरीवाल यांना लक्ष्य केले. यामुळे दिल्लीच्या जनतेमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली.
Jalna News: राज्य सरकारची मोठी कारवाई; मनोज जरांगेंचा मेव्हणा तडीपार
यमुना नदीतील वाढते प्रदूषण आणि दूषित पाण्याचा प्रश्न देखील या निवडणुकीत मोठा मुद्दा ठरला. भाजपने आरोप केला की, आम आदमी पक्षाच्या सत्तेत यमुना नदीची स्थिती अधिकच वाईट झाली आहे. डिसेंबर 2024 मध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारी टॅपमधील पाणी प्यायल्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता, मात्र भाजपने याला प्रतिउत्तर देत दिल्लीत ठिकठिकाणी गढूळ पाणीपुरवठ्याचे उदाहरण दिले. हा मुद्दा भाजपच्या प्रचाराचा मुख्य भाग बनला आणि मतदारांनी याकडे गांभीर्याने पाहिले.
भाजपने निवडणुकीपूर्वी दिल्लीतील महिलांसाठी दरमहा ₹2500 देण्याचे आश्वासन दिले. यासोबतच, गरीब कुटुंबांना गॅस सिलेंडरवर ₹500 सबसिडी आणि सणासुदीच्या काळात एक मोफत सिलेंडर देण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः आपल्या सभांमध्ये हे आश्वासन दिले आणि भाजप सत्तेत आल्यावर त्वरित अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. महिलांसाठीच्या या योजनेने भाजपला मोठा जनाधार मिळवून दिला.
लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाण क्षणार्धात होईल स्वच्छ! आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन
दिल्ली निवडणुकीत भाजपच्या प्रचाराची धुरा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांभाळली. त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेत आम आदमी पक्षावर थेट हल्ले केले. अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात परवेश वर्मा, तर मुख्यमंत्रीपदाची प्रमुख दावेदार आतिशी यांच्याविरोधात रमेश बिधूडी यांना मैदानात उतरवण्यात आले. या लोकप्रिय नेत्यांनी आपच्या नेतृत्वाला मोठ्या अडचणीत आणले आणि भाजपला विजय मिळवून दिला.
भाजपने या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नाही. यामुळे दिल्लीत विविध समुदाय, जसे की पूर्वांचली, पंजाबी आणि पहाडी मतदार एकत्र आले. भाजपने हीच रणनीती अन्य राज्यांत यशस्वीपणे राबवली असून, दिल्लीमध्येही त्याचा मोठा फायदा झाला. मतदारांनी भाजपवर विश्वास ठेवत एकत्रित मतदान केले आणि पक्षाला विजयाकडे नेले. या पाच प्रमुख मुद्द्यांमुळे दिल्लीच्या जनतेने यंदा भाजपला जोरदार पाठिंबा दिला. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून, दिल्लीत राजकीय समीकरणे बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.