नवी दिल्ली : G-20 शिखर संमेलनाच्या निमित्ताने जगभरातील नेते भारतात दाखल होत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचेही भारतात आगमन झाले आहे. भव्य अशा विमानातून आपले मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत ते दिल्ली विमानतळावर उतरले आहेत. यावेळी भारताकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
#WATCH | G-20 in India: US President Joe Biden arrives in Delhi for the G-20 SummitHe was received by MoS Civil Aviation Gen (Retd) VK Singh pic.twitter.com/U0qyG0aFcp— ANI (@ANI) September 8, 2023
जनरल व्ही. के. सिंह स्वागतासाठी उपस्थित
जनरल व्ही. के. सिंह हे बायडन यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. अत्याधुनिक अशा कारमधून ते आपल्या हॉटेलकडे रवाना झाले. त्यांच्या राहण्याची व्यवस्था आयटीसी मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये करण्यात आलीये. अमेरिकेन प्रतिनिधींसाठी ५०० खोल्या बूक करण्यात आल्याची माहिती आहे.
जो बायडन पहिल्यांदाच भारतात
जो बायडन पहिल्यांदाच भारतात आले आहेत. बायडन यांच्या येण्याबाबत सांशकता होती. शिवाय त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे बायडन हे भारतात येतील का? याबाबत शंका होती. पण, अखेर त्यांचे भारतात आगमन झाले आहे.
शस्त्रसज्य विमानातून जो बायडन यांचे आगमन
जो बायडन हे ज्या विमानातून आले आहेत, ते अत्यंत विशेष आहे. हवतून हवेत मारा करू शकणारे शस्त्रसज्य असे हे विमान आहे. राष्ट्राध्यक्षांना संपूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व प्रकारची तयारी या विमानात असल्याचं सांगण्यात येतं आहे.
Web Title: G 20 summit us president joe biden arrives in india warm welcome from india watch video nryb