Big Savings' sale has started on Flipkart; Bumper discounts on fan-coolers and ACs

Discount on Cooler : उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्या आहेत. आता उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्टने मोठा 'बिग बचत सेल' सुरू केला आहे. या सेलमध्ये फॅन आणि कूलरवर मोठा डिस्काउंट उपलब्ध झाला आहे. अगदी 999 रुपयांपासून इथे ब्रँडेड फॅन्स आणि कूलर उपलब्ध आहेत.

  Flipkart Big Bachat Days : फ्लिपकार्टचा ‘बिग बचत डेज’ सेल आता सुरू झाला आहे. या सेलमध्ये मोबाईल, ग्रोसरी आणि इलेक्ट्रॉनिक आयटम्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देण्यात येतो आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. या सेलमध्ये फॅन-कूलर आणि एसीवरदेखील सूट मिळत आहे.

  हजार रुपयांपेक्षा स्वस्त कूलर
  उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर या सेलमध्ये फॅन आणि कूलरवर मोठा डिस्काउंट उपलब्ध आहे. अगदी 999 रुपयांपासून इथे ब्रँडेड फॅन्स आणि कूलर उपलब्ध आहेत. यामध्ये एसीलाही लिस्ट करण्यात आले आहे. 25 हजार रुपयांपासून या ठिकाणी AC उपलब्ध आहेत.
  टीव्हीवर मोठा डिस्काउंट
  फ्लिपकार्टच्या Big Bachat Days सेलमध्ये स्मार्ट टीव्हींवरदेखील मोठा डिस्काउंट पहायला मिळत आहे. ठिकाणी 6,499 रुपयांपासून Smart TV उपलब्ध आहेत. फ्लिपकार्टच्या MarQ या ब्रँडसह अन्य मोठ्या ब्रँड्सच्या टीव्हींवर मोठी सूट मिळत आहे.

  फ्लिपकार्टने बिग बचत डेज सेलसाठी वेगळी मायक्रोसाईट तयार केली आहे. याठिकाणी ग्रोसरी, फॅशन, ब्युटी अँड ग्रूमिंग, स्मार्ट गॅजेट्स, फूड, किड्स फॅशन, ऑटो अ‍ॅक्सेसरीज, किचन अप्लायन्सेस, होम डेकॉर आणि ट्रॅव्हल अशा विविध कॅटेगरीज आहेत. यासोबतच अंडर 99, अंडर 299 आणि अंडर 499 असे किंमतीनुसार वेगळे सेक्शनही देण्यात आले आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही नवीन कपडे किंवा स्किनकेअर प्रॉडक्ट्स घेण्याच्या विचारात असाल, तर फ्लिपकार्टचा हा सेल तुमच्या फायद्याचा ठरू शकतो.