Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; तीव्र वादळामुळे 62 जणांचा मृत्यू, अनेक जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित

मुसळधार पाऊस आणि धुळीच्या वादळामुळे अनेक भागांतील रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. याच वादळामुळे विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 62 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 14, 2026 | 07:07 AM
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; तीव्र वादळामुळे 62 जणांचा मृत्यू, अनेक जिल्ह्यांत वीजपुरवठा ठप्प

उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; तीव्र वादळामुळे 62 जणांचा मृत्यू, अनेक जिल्ह्यांत वीजपुरवठा ठप्प

Follow Us
Follow Us:

लखनौ : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. उन्हाचा कडाका बसत असतानाच आता काही ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण वादळ आणि पावसामुळे हाहा:कार उडाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले. त्यामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. ग्रामीण भागात मातीची घरे आणि पत्र्याची शेड उडून गेली, तसेच पिकांचे मोठे नुकसान झाले.

मुसळधार पाऊस आणि धुळीच्या वादळामुळे अनेक भागांतील रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. याच वादळामुळे विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 62 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये भदोहीमध्ये ११, मिर्झापूरमध्ये सहा, सीतापूरमध्ये दोन, कानपूर विभागात १४, प्रयागराजमध्ये नऊ, प्रतापगडमध्ये चार, रायबरेलीमध्ये दोन, संभलमध्ये दोन आणि बरेलीमध्ये १४ जणांचा समावेश आहे. प्रशासनाने बाधित भागांमध्ये मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. नुकसानीचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी पावसाचा इशारा दिला असून, लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील बांदा हे सर्वात उष्ण ठिकाण ठरले आहे. याठिकाणी ४५.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. वादळ आणि पावसामुळे राज्यात उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी, बुंदेलखंडसह दक्षिणेकडील जिल्ह्यांमधील कडक ऊन आणि तीव्र उष्णतेमुळे लोक त्रस्त झाले होते. ४५.४ अंश सेल्सिअस तापमानासह बांदा हे राज्यातील सर्वात उष्ण शहर म्हणून नोंदवले गेले.

राज्याच्या इतर भागांत उष्णतेत वाढ

दुसरीकडे, झाशीमध्ये ४४.५ अंश सेल्सिअस, प्रयागराजमध्ये ४३.५ अंश सेल्सिअस, हमीरपूरमध्ये ४३.२ अंश सेल्सिअस आणि ओराईमध्ये ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. लखनौ येथील प्रादेशिक हवामान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अतुल कुमार सिंह यांच्या मते, गुरुवारपासून तापमानात हळूहळू वाढ होईल. १६ मे पासून बुंदेलखंड आणि दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आणि उष्णता वाढण्याची शक्यता आहे.

Monsoon Update : 25 ते 27 मेदरम्यान केरळमध्ये दाखल होणार मान्सून, पाच राज्यांसाठी दिला ‘हा’ इशारा

Web Title: Heavy rain in uttar pradesh 62 dead due to severe storm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

एक तासाच्या पावसातच घरांमध्ये पाणी; केडीएमसीच्या नालेसफाईच्या दाव्यावर नगरसेवक कुणाल पाटील यांचा संतप्त ससंतप्
1

एक तासाच्या पावसातच घरांमध्ये पाणी; केडीएमसीच्या नालेसफाईच्या दाव्यावर नगरसेवक कुणाल पाटील यांचा संतप्त ससंतप्

Maharashtra Rain Alert: ‘आला गं बाई आला’! पुण्यासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार, २४ तासांत…
2

Maharashtra Rain Alert: ‘आला गं बाई आला’! पुण्यासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार, २४ तासांत…

Maharashtra Weather: वेळीच सावध व्हा! महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट, कुठे किती बरसणार?
3

Maharashtra Weather: वेळीच सावध व्हा! महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट, कुठे किती बरसणार?

Pune Rain Update: पुण्यात पावसाची ‘धडाकेबाज’ एन्ट्री; शहरात अनेक ठिकाणी बरसल्या जोरदार सरी
4

Pune Rain Update: पुण्यात पावसाची ‘धडाकेबाज’ एन्ट्री; शहरात अनेक ठिकाणी बरसल्या जोरदार सरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.